Bigg Boss Marathi 2: विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या कारचा अमरावतीजवळ अपघात

‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरे एका अपघातामधून थोडक्यात बचावला आहे.
Bigg Boss Marathi 2: विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या कारचा अमरावतीजवळ अपघात
Bigg Boss Marathi 2: विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या कारचा अमरावतीजवळ अपघातSaam Tv

अमरावती : ‘बिग बॉस मराठी २’चा Bigg Boss Marathi 2 विजेता शिव ठाकरे Shiv Thakare एका अपघातामधून थोडक्यात बचावला आहे. शिव ठाकरे त्याच्या कुटुंबाबरोबर प्रवास करत असताना अमरावती जिल्ह्यामधील वळगाव जवळ त्याच्या कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने, शिव आणि त्याचे कुटुंब सुखरूप आहेत. या अपघतात शिवच्या चेह-याला गंभीर प्रमाणात दुखापत झाली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीवरून अचलपूरकडे निघाला होता. यादरम्यान वळगाव जवळ त्याच्या कारला मागून टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, शिवची कार थेट शेतात कलंडली आहे. या अपघातात कारचा मागचा भाग चकनाचूर झाला आहे.

Bigg Boss Marathi 2: विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या कारचा अमरावतीजवळ अपघात
Pune: भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीवरील बालकाचा मृत्यू

शिवच्या चेह-याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या आई आणि बहिणीला किरकोळ मार लागला आहे. मात्र, गाडीचा मागील भाग चकनाचूर झाला आहे. अपघातानंतरचा शिवचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्या चेह-याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com