Rashmika-Shreyas Talpade:भर स्टेजवर श्रीवल्लीने केलं किस; रश्मिकाच्या प्रेमात श्रेयस लाजून झाला चूर

Romance Of Rashmika-Shreyas: श्रेयस आणि रश्मिका यांच्यामधील प्रेमळ संवादाने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Romance Of Rashmika-Shreyas
Romance Of Rashmika-ShreyasSaam TV

Rashmika-Shreyas Talpade On Stage Romance:अभिनेता श्रेयस तळपदे बऱ्याच वर्षांनी झी मराठी वाहिनीवरील मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ'च्या माध्यमातून टीव्हीवर झळकला होता. या माळेच्या माध्यमातून श्रेयस पुन्हा महाराष्ट्राच्या घराघरात पोचला. यशवर्धन ही त्याची व्यक्तिरेखा अनेकांना आवडली होती. स्नेहाच्या प्रेमात असलेल्या यश आता श्रीवल्लीच्या प्रेमात पडला आहे.

झी मराठीच्या चित्रगौरव पुरस्काराच्या मंचावर श्रेयस आणि श्रीवल्लीचे प्रेम फुलले आहे. झी मराठी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने हजेरी लावली आहे. तसेच तिने तिच्या प्रसिद्ध गाण्यांवर सादरीकरण देखील केले आहे. यादरम्यान श्रेयस आणि रश्मिका यांच्यामधील प्रेमळ संवादाने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Romance Of Rashmika-Shreyas
Rajinikanth: वानखेडेवर कोहली - शर्मा पेक्षा रंगली थलायवाची चर्चा; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात रजनीकांतच्या उपस्थितीने लावले चार चांद

झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस त्याच्या को-अँकर निलेश साबळे विचारत आहे की, तू बघतेय का माझ्याकडे? त्यावर निलेश साबळे उत्तर देतो की, हो बघतेय. त्यानंतर श्रेयस पुष्पा या चित्रपटातील फेमस डायलॉग म्हणतो, पुष्प नाम सुनकर फ्लॉवर समजे क्या? फायर है मैं फायर... त्यानंतर श्रेयस रश्मिकाला फ्लाईंग किस करतो. रश्मिका लाजून मन खाली घालते आणि नंतर तिच्या अंदाजात श्रेयस देखील फ्लाईंग किस करते.

रश्मिका आणि श्रेयस हा गोड व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उत्तर आहे. हा तर एक छोटा प्रोमो आहे. दोघांची खूप छान अभिनय करून सोहळ्यात नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले असणार आहे.

श्रेयसने पुष्प चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज दिला आहे. म्हणजेच चित्रपटामध्ये पुष्पा पात्राचा आवाज डब केला आहे. त्यामुळे रश्मिकाने आणि श्रेयस पुष्पा चित्रपटातील एक सीन मंचावर सादर केला आहे.

रश्मिका झी गौरव पुरस्कार सोहळ्यात दिसणार असल्याने सर्वजण उत्सुक आहेत. विशेष म्हणजे यावेळी रश्मिका श्रेवल्ली आणि सामे सामे या गाण्यांवर सादरीकरण करणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com