Online Fraud: अभिनेत्रीला लाखोंचा गंडा; पॅन कार्ड अपडेट करणं पडलं महागात

नगमा यांनी बांद्रा पोलीस ठाण्यात सायबर फ्रॉडची तक्रार केली आहे.
Cyber Fraud Hits Actor-Politician Nagma
Cyber Fraud Hits Actor-Politician NagmaSaam TV

Cyber Fraud Hits Actor-Politician Nagma: अभिनेत्री आणि कांग्रेस नेत्या नगमा यांनी मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात सायबर फ्रॉड झाल्याची तक्रार दाखल केली आहे. नगमा यांच्या बँक खात्यातून एक १लाख रुपये गायब झाले आहेत. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखलकेला आहे.

पोलिसांनी या व्यक्ती विरोधात आयपीसी कलम ४२०, ४१९ ६६सी आणि ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस सुरू करण्यात आला आहे. 'तुमचे पॅन कार्ड अपडेट करा नाहीतर तुमचे नेट बँकिंग ब्लॉक करण्यात येईल', असा मेसेज

Cyber Fraud Hits Actor-Politician Nagma
Oscars 2023: 'नाटु नाटु' हे फक्त गाणे नाही तर.... दीपिकाच्या व्हिडिओवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्विट चर्चेत

२८ फेब्रुवारी रोजी नगमा यांच्या मोबाईलवरआला होता. त्यानंतर नगमा यांनी त्या मेसेजसोबत आलेल्या लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक करताच ओटीपी मागण्यात आला. नगमा यांनी ओटीपी टाकताच त्यांच्या बँक खात्यातून ९९,९९८ रुपये काढण्यात आले.

या सर्व प्रकरणाची तक्रार नगमा यांनी बांद्रा पोलीस ठाण्यात केली आहे. गेल्या दोन आठवड्यात असे अनेक गुन्हे घडले आहेत. मुंबई सायबर सेलकडे ७० हुन अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु अद्याप कोणालाच अटक करण्यात आलेली नाही.

फ्रॉड कॉल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३०० हुन अधिक सिम कार्डचा शोध घेण्यात पोलिसांनी यश आले आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, ५००० हुन अधिक सिम कार्डचा असे फ्रॉड कॉल करण्यासाठी वापर करण्यात येत आहे. हा एक ऑर्गनाईज क्राईम आहे. जो एक गँग चालवत आहे.

सायबर डीसीपीच्या म्हणण्यानुसार, लाखो लोकांना असे मेसेज पाठविण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या गँग कुठून ऑपरेट केली जात आहे आणि यात किती लोक आहेत, हे अजूनही समजलेले नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com