Anushka Sharma: कमी वेळात उभं केले साम्राज्य; आज आहे 'इतक्या' कोटींची मालकीन

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने अगदी कमी वेळात भरपूर नाव कमावले आहे.
Anushka Sharma: कमी वेळात उभं केले साम्राज्य; आज आहे 'इतक्या' कोटींची मालकीन
Anushka Sharma | Virat KohliSaam TV

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने अगदी कमी वेळात भरपूर नाव कमावले आहे. अभिनेत्रीने प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीसोबत (Virat Kohli) लग्न केले आणि तिच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. त्यानंतर गेल्या वर्षी विराट आणि अनुष्काने एका मुलीला जन्म दिला. आज 1 मे अनुष्काचा वाढदिवस (Anushka Sharma Birthday) आहे. अभिनेत्री आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या कारकिर्दीच्या अगदी कमी कालावधीत अनुष्काने खूप मोठी फॅन फॉलोइंग कमावली आहे. यासोबतच आज अनुष्काची गणना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींमध्ये केली जाते.

अनुष्का शर्मा तिच्या अभिनय आणि यशस्वी करिअरमुळे विलासी जीवन जगते. ही अभिनेत्री जवळपास 350 कोटींची मालक आहे. पती-पत्नी दोघांच्या एकत्रित संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, दोघांची एकूण संपत्ती 1200 कोटी आहे, त्यात तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीच्या मालमत्तेचा समावेश आहे. या जोडप्याने लग्नानंतर लगेचच मुंबईत 34 कोटींचे अपार्टमेंट खरेदी केले होते. याशिवाय त्यांच्या नावावर गुरुग्राममध्ये 80 कोटींची मालमत्ता आहे. (Anushka Sharma Net Worth)

भारतातील सर्वात श्रीमंत जोडप्यांमध्ये गणना

फोर्ब्स इंडियाच्या 2019 यादीनुसार, हे कपल भारतातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहे. याशिवाय विराट कोहलीचे दिल्लीत एक आलिशान घर आहे. तसेच विराट आणि अनुष्काकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याचबरोबर अनुष्का शर्माने केवळ चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून खूप कमाई केली आहे.

अनुष्का क्लीन स्लेट फिल्म्स प्रोडक्शन हाऊसची मालकीन

अनुष्काच्या आवडीच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटांसोबतच अनुष्काची आवड चित्रपट निर्मितीकडेही आहे. 2020 मध्ये सुपरहिट वेब सीरिज 'पातलोक' अनुष्काच्या प्रोडक्शन कंपनीनेच तयार केली होती. अभिनेत्रीच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव क्लीन स्लेट फिल्म्स आहे.

अनुष्काने या दोन चित्रपटांची केली निर्मिती

कोविड महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान ही वेब सिरीज Amazon Prime वर दाखवण्यात आली होती. त्यानंतर ही वेब सिरीज लोकांना फारच खूप आवडली. यासोबतच अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या 'बुलबुल' चित्रपटाचेही खूप कौतुक झाले. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला. प्रेक्षकांना तो खूप आवडला.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.