Bhagyashree Mote Sister: अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण मधुचा संशयास्पद मृत्यू; चेहऱ्यावर आढळल्या जखमा

भाग्यश्रीने बहिणीचे फोटो शेअर करत दिली बहिणीच्या निधनाची माहिती.
Bhagyashree Mote Sister Passes Away
Bhagyashree Mote Sister Passes AwayInstagram @bhagyashreemote

Bhagyashree Mote Sister Passes Away: मराठमोळी सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण मधु मार्केंडेयचा मृतदेह पिंपरी-चिंचवड येथील वाकड येथे संशयास्पद स्थितीत आढळा आहे. पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत.

भाग्यश्री मोटेने तिच्या सोशल मीडियावर बहिणेचे फोटो शेअर करत तिच्या निधनाची माहिती दिली आहे. भाग्यश्रीने बहीण गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे म्हटले आहे.

Bhagyashree Mote Sister Passes Away
Oscars 2023: दीपिकाचे गॉर्जियस फोटो नेटकऱ्यांना पाडतायेत भुरळ, खास लूकची होतेय सर्वत्र चर्चा

भाग्यश्रीने टिक्सच्या सोशल मीडिया स्वतःचा आणि बहिणीचा एक फोटो शेअर केला आहे. भाग्यश्रीने आपल्या बहिणीच्या निधनावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. भाग्यश्रीने या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'माझ्या लाडक्या बहिणीने या जगाचा निरोप घेतला! माझी आई, बहीण, मैत्रीण, विश्वासू आणि काय नव्हतीस? तू माझा आधार होतीस. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा केंद्रबिंदू होतीस. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवले आहे. तुझ्याशिवाय या आयुष्याचं काय करू? हे तू मला कधीच शिकवलं नाहीस. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही. मी कधीच नाही. कधीच नाही.'

या पोस्टच्या आधीही भाग्यश्रीने तिच्या बहिणीसाठी काही पोस्ट केल्या होत्या. बहिणींसोबतचा गोड फोटो शेअर करत भाग्यश्रीने त्या पोस्टला 'तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईल.' असे कॅप्शन दिले होते. तर बहिणीच्या गालावर किस करतानाच फोटो शेअर भाग्याशीने त्याला 'तू नाहीयेस?', असे कॅप्शन दिले आहे.

मधु मार्कंडेय हा पिंपरी-चिंचवड येथील वाकड परिसरात केकचा व्यवसाय करायची. मित्रासोबत भागीदारीत मधू हा व्यवसाय चालवत होती. शेवटच्या दिवशी रविवारी मधू तिच्या मित्रासोबत भाड्याने दुकान शोधण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला चक्कर आली. मधुचा मित्र तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेला. तेथून त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रेफर केले. रुग्णालयात पोचताच डॉक्टरांनी मधूला मृत घोषित केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com