अभिनेत्रीचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये सापडला; पतीला अटक

पोलिसांच्या पथकाने मृतदेह ताब्यात घेतला असून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अभिनेत्रीचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये सापडला; पतीला अटक
अभिनेत्रीचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये सापडला; पतीला अटक Saam Tv

बांगलादेशची (Bangladesh) प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (Raima Islam Shimu) अचानक बेपत्ता झाल्यानंतर आता तिचा मृतदेह राजधानी ढाक्याच्या हद्दीत सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह सोमवारी केरानीगंजमधील हजरतपूर पुलाजवळ एका गोणीत सापडला होता. विशेष म्हणजे, रायमा इस्लाम शिमू या पूर्वी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी कालाबागान पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने केरानीगंज मॉडेल स्टेशनमधून मृतदेह ताब्यात घेतला असून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

रायमा इस्लाम शिमूच्या पतीसह ६ जणांना ताब्यात घेतले

ढाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर सलीमुल्ला मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोमवारी सकाळी ढाक्याच्या केरानीगंजमधील आलियापूर भागात हजरतपूर पुलाजवळ रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला. मृतदेह एका गोणीत ठेवण्यात आला होता. अभिनेत्रीच्या मानेवर जखमेच्या खुणा असल्याने अभिनेत्रीचा खून झाल्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्रीच्या पतीसह ६ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

अभिनेत्रीचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये सापडला; पतीला अटक
वरुण धवनवर दुःखाचा डोंगर कोसळला; जवळच्या व्यक्तीचे निधन

शूट करण्यासाठी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला

रायमा आपल्या कुटुंबासोबत ढाक्यातील ग्रीन रोड येथे राहत होती. तिच्या कुटुंबात पती आणि दोन मुले आहेत. रविवारी सकाळी रायमा शूटिंगसाठी घरातून निघाली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी कालाबागान पोलीस ठाण्यात तक्रार केली.

25 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले

अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूने 1998 मध्ये 'बार्तामन' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तेव्हापासून तिने 25 चित्रपट आणि काही टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com