हैदराबादमध्ये सेटवर दीपिका पदुकोणची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

शूटिंगदरम्यान दीपिकाची तब्येत बिघडली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.
हैदराबादमध्ये सेटवर दीपिका पदुकोणची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल
Deepika PadukoneSaam Tv

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगदरम्यान दीपिकाची तब्येत बिघडली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या ती हैदराबादमध्ये अभिनेता प्रभाससोबत चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होती.

दीपिका पदुकोण तिच्या 'प्रोजेक्ट के'च्या निमित्ताने हैदराबादला गेली होती. तिथे अभिनेत्री तिचे शूटिंग करत होती. या चित्रपटात दीपिका पदुकोण साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये हे शूटिंग सुरू होते. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार दीपिका पदुकोणची तब्येत आता ठीक असल्याचं बोललं जात आहे.

Deepika Padukone
'...तर नुकसानीची शक्यता'; बीड कृषी विभागाचे शेतकर्‍यांना आवाहन

तर, दीपिका पदुकोणच्या टीमकडून या अहवालावर अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दीपिका पदुकोण 'प्रोजेक्ट के' चित्रपटाचे शूटिंग करत असताना अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. नंतर ती शूटिंगलाही परतली. तर, अद्याप या गोष्टींबद्दल दीपिका पदुकोणच्या टीमकडून कोणतीही पुष्टी आलेली नाही.

दीपिका पदुकोण रविवारी 12 जून रोजी हैदराबादमधील कामिनेनी रुग्णालयात गेली होती. अचानक प्रकृती खालावल्याने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तर तपासून झाल्यावर त्याच दिवशी डॉक्टरांनी तिला परत पाठवले होते. दरम्यान, कमिनेनी हॉस्पिटल दीपिका पदुकोणच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर तब्येत बिघडल्यामुळे दीपिका मुंबईला रवाना झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील पाहा-

दिपीकाचा आगामी चित्रपट 'पठाण' आहे. या चित्रपटात दीपिकासोबत शाहरुख खान काम करत आहे. दीपिकाने तिच्या करिअरची सुरुवात शाहरुख खानसोबत केली होती. पुन्हा एकदा किंग खानसोबत पडद्यावर झळकणार आहे. तर, 'पठाण' व्यतिरिक्त दीपिका हृतिक रोशनसोबत 'फायटर'मध्ये दिसणार आहे. दीपिका प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के'मध्येही दिसणार आहे. यापूर्वी दीपिका पदुकोण काही काळापूर्वी शकुन बत्राच्या 'घेराइयां' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. यामध्ये दीपिका पदुकोणने सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत स्क्रीन शेअर केली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com