अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात; प्रतीक शाहसोबत शेअर केले लग्नाचे खास फोटो

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा
अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात; प्रतीक शाहसोबत शेअर केले लग्नाचे खास फोटो
Actress Hruta DurguleInstagram

मुंबई : छोट्या पडद्यावर कामात करत असलेली 'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' सिरीयलमधून (serial) हृता दुर्गुळे (Hruta Durgule) प्रत्येकांच्या घरात लोकप्रिय झाली आहे. आपल्या लाघवी सौंदर्यामुळे आणि अभिनयाने हृतानं प्रत्येकाच्या मनात स्वतः एक घर केले आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात (marriage) आहे. विशेषतः तरुणांच्या मनात हृताचं तर खास स्थान आहे. अनेक तरुणांचा हृदयभंग करून हृता दुर्गुळे हिने तिचा बॉयफ्रेंड प्रतिक शाहबरोबर आज सप्तपदी चालत तिने आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला आहे.

हे देखील पाहा-

प्रतिक आणि हृताच्या लग्नसोहळ्याला दोघांच्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते. मराठी सीरियल्स ऑफिशियल या इन्स्टाग्राम पेजवरून हृताने तिच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे. हृताच्या चाहत्यांनी या फोटोवर मोठ्या प्रमाणावर कमेंट करत तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हृताचा नवरा प्रतिक शाह हा हिंदी सिरीयलमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे.

Actress Hruta Durgule
औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी 5 दिवस बंद, पुरातत्व विभागाचा निर्णय

प्रतिकने आजपर्यंत अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. 'तेरी मेरी इक जिंदगी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या अनेक सिरियलचा समावेश आहे. प्रतिक शाह हे हिंदी मालिकाविश्वात एक प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या हृताने मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमात जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. हृता दुर्गुळे 'दुर्वा' या सिरीयलमधून सर्वांसमोर आली होती. या मालिकेने जवळपास हजार एपिसोडचा टप्पा पूर्ण केला होता. यानंतर ती 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. या मालिकेपासून तरुणाईमध्ये तिची प्रचंड क्रेझ निर्माण झालेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com