Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'बोल्डनेस' चा सोशल मीडियावर जलवा; व्हिडीओ पाहून यूजर्स म्हणाले..

सोशल मीडियावर इंटरनेटचा पारा वाढवणारी अभिनेत्रीने नुकताच तिच्या नवीन लूकने सर्वत्र खळबळ उडवली आहे.
Janhvi Kapoor News
Janhvi Kapoor NewsInstagram @janhvikapoor

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे प्रकाशझोतात असते. जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत राहते. सोशल मीडिया जान्हवी प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवी तिचे फोटो व्हिडिओ शेअर करते. सोशल मीडियावर (Social Media) इंटरनेटचा पारा वाढवणारी अभिनेत्रीने नुकताच तिच्या नवीन लूकने सर्वत्र खळबळ उडवली आहे.

Janhvi Kapoor News
Bigg Boss 16 : सलमान खानच्या शोमध्ये ग्लॅमरचा तडका, मिस इंडिया रनर अपची एन्ट्री

अलीकडेच जान्हवी मुंबईत एका कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. यावेळी जान्हवीने ऑरेज कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. जान्हवी या सेक्सी बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. जान्हवीने केसांचा हाय पोनी हेअरस्टाईल करून नो मेकअपसह लूक पूर्ण केला आहे. जान्हवीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूर न्यू सिझलिंग लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे, यात शंका नाही. जान्हवीचा हा स्मोकिंग-हॉट लूक चाहत्यांना धुंद करत आहे. काही तासांतच जान्हवीच्या या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. सोशल मीडियावर जान्हवीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी तिच्या टीमसोबत हॉटेलच्या लॉबीमध्ये दिसत आहे. यावेळी तिने मीडियाशी संवाद साधला आणि कॅमेऱ्यासमोर पोज दिली आहे. पण हा व्हिडिओ बघताच यूजर्सने जान्हवीला ट्रोल करायला सुरुवात केली. काही यूजर्सला जान्हवीचा हा बोल्ड लूक आवडला नाही. व्हिडिओवर काहीनी जान्हवीच्या अभिनयावर निशाणा साधला आहे.

Janhvi Kapoor News
Raju Srivastav : 'हमे तुमसे प्यार कितना', राजू श्रीवास्तव यांचा कुटुंबासोबतचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल

जान्हवीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा नवीन लूक शेअर केला आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांसह सेलिब्रिटींनी लाईक्स केल्या आहेत. याशिवाय जान्हवीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर लवकरच ती 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये दिसणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच जान्हवीचा सनी कौशलसोबत 'मिली' नावाचा चित्रपटही आहे. तसेच ती वरुण धवनसोबत 'बावल' चित्रपटातही दिसणार आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com