अयान मुखर्जीने ६०० कोटी रुपयांचा केला चुराडा, 'ब्रह्मास्त्र'मध्ये 'शिवा' नाही तर...; कंगना रणौतचा गंभीर आरोप

अभिनेत्री कंगनाने 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहरवर टीका केली आहे.
Actress Kangana has criticized Brahmastra
Actress Kangana has criticized BrahmastraSaam Tv

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रणौत(Kangana Ranaut) अभिनयासोबत तिला स्पष्ट वक्तेपणामुळेही चर्चेत असते. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) या चित्रपटाचे देश-विदेशात कौतुक होतं आहे. परंतु अभिनेत्री कंगनाने 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहरवर टीका केली आहे. अनेक वर्षांपासून करण जोहरसोबतच्या भांडणामुळे चर्चेत असलेल्या कंगनाने आरोप केला आहे की, या चित्रपटासाठी अयान मुखर्जी आणि करण जोहरने ६०० कोटी रुपयांचा चुराडा केला असून प्रेक्षकांच्या भावनांचा धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतला आहे.

Actress Kangana has criticized Brahmastra
Brahmastra : बॉयकॉट ट्रेंडमध्येही ब्रम्हास्त्र चालला! दुसऱ्याच्या दिवशी १०० कोटी क्लबमध्ये समावेश

कंगनाने असा दावा केला की, अयानने ६०० कोटी रुपये वाया घालवले आहेत आणि प्रेक्षकांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतला आहे. कंगना टीका करत म्हणाली,'अयान मुखर्जीला जीनियस म्हणणाऱ्या प्रत्येकाला ताबडतोब तुरुंगात टाकले पाहिजे. हा चित्रपट बनवण्यासाठी त्याला १२ वर्षे लागली, त्याने या चित्रपटासाठी ४०० दिवसांपेक्षा जास्त काळ घालवला, १४ डीओपी बदलले आणि ८५ एडी बदलले आणि ६०० कोटी बरबाद केले आहे'.

Actress Kangana has criticized Brahmastra
Big Boss Season 4: बिग बॉसच्या घरात लवकरच होणार किलबीलाट, तारीख ठरली पण स्पर्धकांचे काय होणार?

कंगना पुढे म्हणली, 'बाहुबलीच्या यशामुळे अयानने शेवटच्या क्षणी चित्रपटातील रणबीरचे नाव जलालुद्दीन रुमी बदलून शिवा असे करून प्रेक्षकांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला'. इतकंच नाही तर कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अयान आणि करण जोहरला लोभी आणि संधीसाधू असल्याचंही म्हटलं आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. 'ब्रह्मास्त्र' हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन ३६ कोटी होते. त्याचबरोबर या चित्रपटाने वर्ल्डवाइड ७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट सध्या प्रचंड कमाई करेल अशी आशा चाहत्यांना

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com