Breaking: अभिनेत्री कंगना रणौतची होणार चौकशी, मुंबई पोलिसांसमोर येण्यास मागितली वेळ

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत बहुतेक वेळा तिच्या वक्तव्यांमुळे जास्तच चर्चेत असते.
Breaking: अभिनेत्री कंगना रणौतची होणार चौकशी, मुंबई पोलिसांसमोर येण्यास मागितली वेळ
Breaking: अभिनेत्री कंगना रणौतची होणार चौकशी, मुंबई पोलिसांसमोर येण्यास मागितली वेळSaam Tv

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत बहुतेक वेळा तिच्या वक्तव्यांमुळे जास्तच चर्चेत असते. आता परत एकदा ती आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत आली आहे. कंगना रणौतविरुद्ध (Kangana Ranaut) एफआयआर मुंबईतील (Mumbai) ४७ वर्षीय व्यापारी अमरजित सिंग संधू, दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांसह दाखल केला होता.

तक्रारकर्त्यांनी कंगनावर जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर आंदोलक शेतकर्‍यांना (farmers) खलिस्तानी दहशतवादी (Terrorist) म्हणून दाखवल्याचा आणि शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. याबाबत मुंबई पोलिसांनी (police) तिला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, सध्या वेळ नसल्याचे सांगत तिने चौकशीसाठी हजर होण्यास वेळ मागितला आहे.

हे देखील पहा-

22 डिसेंबर 2021 रोजी अभिनेत्री कंगनाला खार पोलिस स्टेशनमध्ये (Khar Police Station Mumbai) तिची जबानी नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले. पण, आता अभिनेत्रीने मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितली आहे. कारण अभिनेत्री सध्या शहरात उपलब्ध आणि त्यामुळे कंगनाच्या विनंतीवर मुंबई पोलिसांनी अद्याप कोणतीही सूट दिलेली नाही.

कंगना रणौतच्या वकिलाचे म्हणणे आहे की, कंगना तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमुळे सध्या मुंबईबाहेर आहे. अशा परिस्थितीमध्ये खार पोलीस ठाण्यात त्यांचे म्हणणे नोंदवण्याकरिता त्यांना थोडा वेळ हवा आहे. या संदर्भात कंगनाच्या वकिलाच्या वतीने खार पोलीस स्टेशनला कळवण्यात आले आहे की, ती बुधवारी हजर राहू शकणार नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या बाजूने नवीन तारीख मागितली आहे.

Breaking: अभिनेत्री कंगना रणौतची होणार चौकशी, मुंबई पोलिसांसमोर येण्यास मागितली वेळ
तब्ब्ल 8 तासाच्या ED चौकशीनंतर रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया

कंगना रणौतविरुद्ध एफआयआर मुंबईतील ४७ वर्षीय व्यापारी अमरजित सिंग संधू, दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांसह दाखल केला होता. तक्रारकर्त्यांनी कंगनावर जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर आंदोलक शेतकर्‍यांना खलिस्तानी दहशतवादी म्हणून दाखवल्याचा आणि शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.