
अभिनेत्री कृती वर्माच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. २६३ कोटींच्या टीडीएस रिफेंड घोटाळा प्रकरणात कृती वर्मा अडकली आहे. याप्रकरणी ईडीने मंगळवारी चार्जशीट दाखल केली असून यामध्ये १४ जणांची नावं आहेत. या लिस्टमध्ये कृती वर्माचे देखील नाव आहे. या लिस्टमध्ये घोटाळ्याचे मास्टरमाइंड असलेले माजी इनकम टॅक्स ऑफिसर तानाजी मंडलपासून ते जीएसटी अधिकारी पद सोडून अभिनेत्री झालेल्या कृती वर्माच्या नावाचा समावेश आहे. अभिनेत्री कृती वर्मा 'रोडीज' आणि 'बिग बॉस सीझन १२' मध्ये सहभागी झाली होती.
२६३ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा कृती वर्मावर आरोप आहे. हे संपूर्ण प्रकरण २००७ ते २००८ आणि २००८ ते २००९ चे आहे. जेव्हा सीबीआयकडे बनावट परतावा जारी केल्याची तक्रार आली होती. अशा परिस्थितीत सीबीआयने गुन्हा नोंदवला आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत प्रकरणाचा तपास सुरू केला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये, तानाजी मंडलने २६३.९५ कोटी रुपयांचे १२ बनावट टीडीएस रिफंड जनरेट केल्याचे समोर आले आणि हे बनावट रिटर्न भूषण अनंत पाटील यांच्यासह अनेक व्यक्ती आणि त्यांच्या बनावट कंपन्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात आले होते.
टॅक्स रिफंड देण्याच्या नावाखाली टॅक्स डिपार्टमेंटची फसवणूक करणारे तानाजी मंडल, भूषण अनंत पाटील यांच्यासह अनेक लोकांशी संबंध असल्याचा आणि तत्सम गुन्हे केल्याचा आरोप कृती वर्मावर आहे. या वर्षी जानेवारीमध्ये ईडीने कृती वर्मा, भूषण अनंत पाटील, राजेश शेट्टी यांच्यासह अनेकांची मालमत्ता जप्त केली होती. कृती वर्माने गुरुग्राम, हरियाणात एक मालमत्ता विकली आणि मिळालेले पैसे तिच्या बँक खात्यात जमा केले होते.
याप्रकरणाचा जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा ही जमीन कथित मनी लाँड्रिंगच्या पैशातून खरेदी करण्यात आली असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर ईडीने तिचे अकाऊंट फ्रीज केले. ईडीच्या तपासात असे आढळून आले की, कथित मनी लाँड्रिंगच्या पैशातून कृती वर्माने कर्जत, खंडाळा, लोणावळा, पुणे आणि उडुपी येथे अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली, तिने पनवेल आणि मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी केले. क्रितीने BMW X7, Mercedes GLS 400d आणि Audi Q7 सारख्या लक्झरी कार देखील खरेदी केल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.