Brahmastra : मौनी रॉयचा फर्स्ट लूक पाहून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल...

अभिनेत्री मौनी रॉयचा 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये मौनी रॉय खूप भयानक आणि खतरनाक दिसत आहे.
Mouni Roy  Instagram
Mouni Roy Instagram Saam Tv

मुंबई: निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र- पार्ट १ : शिवा' (Brahmastra) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासोबत मौनी रॉय (Mouni Roy) देखील महत्वाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री मौनी रॉयचा या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये मौनी रॉय खूप भयानक आणि खतरनाक दिसत आहे. अशा भयानक रुपात मौनी रॉयला तिच्या चाहत्यांनी याआधी पाहिलं नसल्यामुळे चाहत्यांच्या मनात या चित्रपटाबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Mouni Roy  Instagram
Squid Game Season 2 : नेटफ्लिक्सवर होणार स्क्विड गेम २ लवकरच प्रदर्शित

अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) दिग्दर्शित केलेला 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. सर्व पात्रांचे एकेक करून पोस्टर्स प्रदर्शित केले जात आहेत. मौनी रॉयच्या लूकपूर्वी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि साऊथचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna) यांचा हटके अवतार समोर आला होता.

'ब्रह्मास्त्र'ची पहिली झलक शेअर करताना करण जोहरने अतिशय आकर्षित कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये करण जोहरने लिहिले की, ''कर ले सबको वश में अपने, अंधेरे की रानी है। ब्रह्मास्त्र को हासिल करना, यह जुनून ने ठानी है।'. या कॅप्शनमध्ये करण जोहरने पुढे लिहिले आहे की, 'अंधाऱ्या जंगलाच्या प्रतिनिधीला भेटा, आमची ही रहस्यमय राणी अंधाराच्या ताकदीने भरलेली आहे'. 'चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. मौनी रॉयच्या या छायाचित्रातून एक गोष्ट स्पष्ट होते की या चित्रपटात मनोरंजनाचा जोरदार तडका आहे.

'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. 'ब्रह्मास्त्र' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला काल्पनिक, धाडसी आणि ट्रायॉलॉजी चित्रपट आहे. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी हिंदी तसेच तमिळ, तेलुगू , मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com