
मुंबई : 'दीवार, याराना','दो दूनी चार',यादों की बारात','अमर अखबर अँथनी','खेल-खेल में' यांसारख्या अनेक चित्रपटांतून अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजेच (Neetu Singh) नीतू सिंग. पती ऋषी कपूर (Rishi kapoor) यांच्या निधनानंतर सुमारे ९ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर नीतू सिंग पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे नीतू सिंगसोबत 'जुग जुग जीयो' सिनेमात (Jug Jug jiyo Movie) दिग्गज अभिनेते अनिल कपूर, कियारा अडवाणी,वरुण धवन आणि मनीष पॉल यांच्याही भूमिका असणार आहेत.
या सिनेमातं प्रमोशन वरुण धवन आणि कियारा अडवाणीने नुकतंच पुण्याच्या एका बेकरीत इव्हेंटच्या माध्यमातून केलं आहे. तसेच नीतू सिंग या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एवढच नाही तर नीतू सिंग डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनियर्स'मध्ये जज म्हणून काम पाहत आहे. 'जुग जुग जीयो' या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण टीम डान्स दिवाने ज्युनियर्स' शो मध्ये नुकतीच गेली होती. त्यावेळी स्पर्धकांसोबत धमाल केली.
'डान्स दिवाने ज्युनियर्स' सेटवर नीतू सिंग यांचा डान्स गाजला
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या अफलातून डान्स स्टाईलमुळं नेहमीच बॉलिवूडच्या लाईमलाईटमध्ये असतो. पण रणबीरची आई नीतू सिंगही गाण्यावर ठेका धरण्यात माहीर आहे. नुकतच नीतू सिंग यांनी या सेटवर एका कारच्या बोनेटवर दिलचस्प अदा सादर करीत भन्नाट डान्स केला आहे. नीतू यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तसेच नीतू यांनी या शोमध्ये जज म्हणून काम पाहणारे मर्झी पेस्तनजीसोबतही डान्सचा ठेका धरला.
या व्हिडिओमध्ये नीतू आणि मर्झी दोघेही कारच्या बोनेटवर नाचतानाचे दृष्य तु्म्ही पाहू शकाता. दोघांनीही मोहम्मद रफी यांच्या 'ओ हसीना जुल्फों वाली जाने जहाँ'या गाण्यावर नृत्य सादर केले .हे गाणे १९६६ मध्ये आलेल्या 'तीसरी मंझिल' या चित्रपटातील असून अभिनेते शम्मी कपूर आणि हेलन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.व्हिडिओमध्ये नीतू सिंग आणि मर्झी पेस्तनजी कारच्या बोनेटवर शम्मी कपूर आणि हेलन यांच्यासारखंच नाचताना दिसत आहेत.
या शोमध्ये नीतू सिंग यांनी पिवळ्या रंगाचा एथनिक सूट परिधान केला होता.तसेच मर्झीने काळ्या रंगाचा आऊटफीट घातला होता. दरम्यान, हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडिओ जणू काही लोकांच्या मनोरंजनाचा एक भागच बनला आहे. तसेच या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटस्चा पाऊस पाडला आहे.
कंमेट बॉक्समध्ये नीतू सिंग यांच्या एका चाहत्याने लिहिलं,'अडथळे बाजूला करुन नदीसारखी वाहत जा… नीतू मॅडम!! दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'खूप सुंदर,खूप छान,डान्सिंग किंग आणि डान्सिंग क्वीन' तसंच दुसऱ्या एकाने कमेंट करताना लिहिले की 'नीतू जी,तुमचे नृत्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे. महत्वाचं म्हणजे दिवंगत ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना कपूर कुटुंबीयांच्या एका चाहत्यानं लिहिलं की, 'ऋषी कपूर असते, तर अजून धमाल आली असती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.