प्रियांका चोप्रानं दिलं निक जोनसला एक 'गोड' सरप्राइज ; चाहते म्हणाले..

तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवून असतात. दरम्यान, प्रियांकाची एक नवीन इंस्टाग्रामची स्टोरी इंटरनेटवर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे
प्रियांका चोप्रानं दिलं निक जोनसला एक 'गोड' सरप्राइज ; चाहते म्हणाले..
Priyanka Chopra-nick JonasSaam Tv

मुंबई : हॉलीवूडमध्येही स्वतःची छाप उमटवणारी प्रियंका चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) या प्रसिद्ध जोडप्याची चर्चाही सोशल मीडियात होत असते. प्रियांक चोप्रा भलेही भारतात राहतं नसली तरीही तिचे चाहते नेहमीच फॉलो करतात. तिचे लाखो चाहते तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवून असतात. दरम्यान, प्रियांकाची एक नवीन इंस्टाग्रामची स्टोरी इंटरनेटवर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ( priyanka chopra Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

प्रियांकाचा पती निक जोनस हा त्याच्या कॉन्सर्टसाठी वेगासला गेला होता. म्हणून प्रियांकाने त्याच्यासाठी एक सरप्राइज प्लॅन केलं होतं. या 'सरप्राइज'चा व्हिडीओ निकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकाने त्याला त्याच्या होटल रूममध्ये एक गोड सरप्राइज दिलं आहे. सरप्राइज बघून निक देखील खूप खूश झाल्याचे दिसत आहे.

कदाचित मी देखील त्या ठिकाणी असते...

निक जोनसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका होटल रूममध्ये आहे. त्या रूममधील एका टेबलच्या अवतीभवती पांढरा व पिवळ्या फुग्यांची सजावट आहे. तसेच त्या टेबलवर शँपेन ठेवली आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूला एका पांढऱ्या फळ्यावर प्रियांकाने एक संदेश लिहिला आहे. 'वेगास रेजिडेंसी बेबी क्रश इट, मला त्या ठिकाणी असण्याची खूप इच्छा होती , लव pri'या व्हिडिओ मध्ये शेवटी निक सो पॉवरफुल, खूप सुंदर ,थैंक्स बेब'. असे बोलून तिच्या सरप्राइजसाठी आभार मानले आहे.

Priyanka Chopra-nick Jonas
"कायम तरुण दिसण्यासाठी मी पॉट्टी देखील खाईन"; किम कदर्शियाच्या विधानानंतर सोशल मीडियावर खळबळ

चाहते करतं आहेत सरप्राइजसाठी प्रियांकाचं कौतुक...

प्रियांका चोप्राच्या एका इंस्टाग्राम फॅनपेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर प्रियांका आणि निकचे चाहते कमेंट करून तिचे भरभरुन कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे, 'Awww cuties,सपोर्टिव वाइफी. आम्हाला खूप आनंद झाला असता, जर ती कॉन्सर्टसाठी जाऊ शकली असती'. दुसऱ्या चाहत्याने लिहिले, 'हे खूप सुंदर आहे, ती का नाही जाऊ शकली, ती अजूनही चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये गुंतलेली आहे का? की ती तिची मुलगी मालती हिच्यासाठी घरी थांबली आहे? अजून एका चाहत्याने लिहिले की, 'अपेक्षा आहे की ती लवकरच निकला जाऊन भेटेल कारण खूप दिवस झाले, आम्हाला त्यांचे एकत्र फोटो पाहायला मिळाले नाही'. आता बघूयात प्रियांका आणि निक चाहत्यांची ही इच्छा कधी पूर्ण करतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com