Rekha Viral Video: रेखाने सर्वांसमोर चाहत्याला मारली चापट, रिॲक्शन बघतच रहाल...

Viral Video: कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने रेखा यांच्या हातून गालावर हलकीशी कानाखालीही मारली आहे. पण त्याने मार खाल्ल्यानंतर केलेली रिॲक्शन कमालीची चर्चेत आली आहे.
Rekha Viral Video
Rekha Viral VideoInstagram

Rekha Viral Video

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री आणि कायमच आपल्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी रेखा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. रेखा आजही आपल्या सौंदर्यामुळे आणि हटक्या स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत राहतात. नुकतंच रेखा यांनी काल संध्याकाळी एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी रेखा यांनी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटला देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या मनमोहक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.

आवडत्या अभिनेत्रीसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक चाहते कायमच उत्सुक असतात. यावेळी कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने रेखा यांच्या हातून गालावर हलकासा मारसुद्धा खाल्ला. पण त्यांनी तो रागाच्या भरात नाही तर, त्यांच्या प्रेमाने किंवा मस्करीत व्यक्तीला गालावर मारलं. पण त्यांनी मारलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Rekha Viral Video
Ira Khan And Nupur Shikhare Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची मुलगी आयराची लगीनघाई, 'या' तारखेला अडकणार विवाहबंधनात

नुकतंच रेखा यांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमामध्ये अनेक पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी एका चाहत्याला आवडत्या अभिनेत्रीसोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवरला नाही. फोटो काढायला गेलेल्या चाहत्याचा आणि रेखा यांचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी रेखा यांनी चाहत्याला अगदी हळूच एक कानाखाली मारली आहे. ती मारल्यानंतरची चाहत्याची रिॲक्शन कमालीची चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ मुंबईतील असून रेखा एका इव्हेंटमधून बाहेर पडताना हा प्रकार घडला आहे,सध्या ही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral Video)

Rekha Viral Video
Jawan 7th Day Collection: सलग तिसऱ्या दिवशी ‘जवान’ची कमाई घसरली, आतापर्यंत जमा केला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला...

बुधवारी (काल) रात्री मुंबईमध्ये ग्लोबल स्पा अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेखा, जरीन खान, वाणी कपूर, मानुषी छिल्लर, रणदीप हुड्डा, मनीष मल्होत्रा, रवीना टंडन आणि जिया शंकरसारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित सेलिब्रिटींमध्ये रेखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये रेखा यांचं निस्सिम सौंदर्य खूपच खुलून दिसत होतं.

रेखा यांच्या या व्हिडीओवर युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. एक युजर म्हणतो, ‘तो माणूस केवढा नशीबवान आहे. त्याला रेखाजींनी स्पर्श केला. आता तो अंघोळसुद्धा करणार नाही’. तर आणखी एक युजर म्हणतो, ‘आजकालचे सेलिब्रिटी रेखाजींना टक्कर देऊच शकत नाहीत.’, तर आणखी एक युजर म्हणतो. रेखा या २०१४ पासून चित्रपटांमध्ये झळकल्या नाहीत. मात्र २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये त्या झळकल्या होत्या.

Rekha Viral Video
Teen Adkun Sitaram Trailer: प्राजक्ता माळीच्या 'तीन अडकून सीताराम'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com