अभिनेत्री सायरा बानो ICU मधून बाहेर, लवकरच मिळणार डिस्चार्ज

सायरा जी नैराश्याने ग्रस्त नाहीत
अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल
अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखलSaam Tv

मुंबई :  दिवंगत अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांची पत्नी सायरा बानो Saira Banu यांना आरोग्याबाबतच्या समस्येमुळे मुंबईतील Mumbai हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये ICU हलवण्यात होते. आता सायरा बानो यांना  ICU मधून बाहेर आणले असून त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टर नितीन गोखले यांनी माहिती दिली आहे.

‘सायरा जी नैराश्याने ग्रस्त नाहीत. तसेच त्यांनी अँजिओग्राफी करण्यासही नकार दिला नाही. गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे अँजिओग्राफी काही दिवसांनी केली जाईल. कारण सर्वप्रथम आपल्याला त्यांच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवावे लागेल. आता सायरा बानो यांना आयसीयूमधून हलवण्यात आले आहे. पूर्वीपेक्षा आता त्या बऱ्या आहेत. तसेच सायरा बानो लवकरच डिस्चार्ज देखील दिला जाऊ शकतो आणि त्यानंतर त्यांना पुन्हा अँजिओग्राफीसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. अशी डॉक्टर नितीन गोखले यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

असे म्हटले जात आहे की, सायरा बानो यांना तीन दिवसांपूर्वी रक्तदाबाची Blood Pressure समस्या होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलीकडेच सायरा बानो यांनी पती दिलीप कुमार यांना गमावले आहे. वयाशी संबंधित समस्यांमुळे दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. सायरा आणि दिलीप कुमार हे 54 वर्षे एकत्र होते. 11 ऑक्टोबर 1966 रोजी सायरा बानो आणि दिलीप कुमार यांचा विवाह Wedding झाला होता.

अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल
Paralympics : चूरशीच्या लढतीत पलक, प्रमाेदच्या यशास हुलकावणी

दिलीप कुमार यांना कायम साथ दिली वर्षानुवर्षे सायरा बानो नेहमी दिलीप कुमार यांच्यासोबत उभ्या राहिल्या. दिलीप कुमार यांना आजरपणच्या वेळेत सेवा करण्याबरोबरच सायरा यांनी त्यांच्या चाहत्यांना आरोग्याशी संबंधित माहितीही दिली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्या माहिती देत असत.सायरा बानो यांनी 1961 साली जंगल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये Bollywood पदार्पण केले. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी 'दुनिया', 'बैराग', 'गोपी और सगीना' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाले आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना ऑन-स्क्रीन तसेच ऑफ-स्क्रीन आवडली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com