अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल

अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांना आरोग्याबाबतच्या समस्येमुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल
अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखलSaam Tv

सायरा बानो: दिवंगत अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांची पत्नी सायरा बानो Saira Banu यांना आरोग्याबाबतच्या समस्येमुळे मुंबईतील Mumbai हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज त्यांना आयसीयूमध्ये ICU हलवण्यात आले आहे अशी माहिती आहे.

हे देखील पहा-

असे म्हटले जात आहे की, सायरा बानो यांना तीन दिवसांपूर्वी रक्तदाबाची Blood Pressure समस्या होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलीकडेच सायरा बानो यांनी पती दिलीप कुमार यांना गमावले आहे. वयाशी संबंधित समस्यांमुळे दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. सायरा आणि दिलीप कुमार हे 54 वर्षे एकत्र होते. 11 ऑक्टोबर 1966 रोजी सायरा बानो आणि दिलीप कुमार यांचा विवाह Wedding झाला होता.

अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल
Nagpur: जिल्हा परिषदेत 'फाईल ट्रॅकर'; भ्रष्टाचाराला बसणार आळा

दिलीप कुमार यांना कायम साथ दिली ;
वर्षानुवर्षे सायरा बानो नेहमी दिलीप कुमार यांच्यासोबत उभ्या राहिल्या. दिलीप कुमार यांना आजरपणच्या वेळेत सेवा करण्याबरोबरच सायरा यांनी त्यांच्या चाहत्यांना आरोग्याशी संबंधित माहितीही दिली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्या माहिती देत असत.

सायरा बानो यांनी 1961 साली जंगल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये Bollywood पदार्पण केले. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी 'दुनिया', 'बैराग', 'गोपी और सगीना' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाले आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना ऑन-स्क्रीन तसेच ऑफ-स्क्रीन आवडली.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com