
सध्या देशभरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या धुमधडात साजरा केला जात आहे. श्रीकृष्णाची जयंती दरवर्षी भाद्रपद कृष्ण अष्टमीच्या दिवशी साजरी केली जाते. आजच्या दिवशी अवघ्या देशभरात दहीहंडीचा सण मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. दहीहंडीनिमित्त अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी पोस्ट शेअर करत जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दहीहंडीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रभरात दडी मारून बसलेला पाऊस देखील पुन्हा बरसायला सुरूवात झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांसोबतच शेतकीरीही सुखावले आहेत. सध्या सोशल मीडियावर पावसाच्या कविता पुन्हा चर्चेत आल्या आहे. यानिमित्ताने जन्माष्टमी आणि पावसाचा संबंध लावत अभिनेत्री स्पृहा जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे. (Actress)
अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “दर गोकुळाष्टमीला तू बरोब्बर पाऊस घेऊन कसा येतोस
की पाऊस होऊन येतोस?
सगळं विज्ञान, भूगोल, लॉजिक आहेच
पण आजच्या दिवशी तुला त्यात बांधावसं नाही वाटत!
उगाचच आज तुझ्याशी भांडावंसं नाही वाटत!
तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खूळ तुला ..
मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयस आमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला?
त्यापेक्षा तुझं विश्वरूप दर्शन.. ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात...
तुझा सारासारविचार टोचला असतास आमच्या बुद्धीला...
आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस..
किमान तुझी गूढ निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस..
असो जिथे आहेस तिथे खुशाल अस!
इथली फार काळजी करू नको..
दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत रहा फक्त
बाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको..” (Song)
दरम्यान स्पृहा जोशीच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री स्पृहा जोशी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायमच आपल्या चाहत्यांसोबत तिच्या कामाबद्दलची माहिती शेअर करत असते. मध्यंतरी स्पृहा झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘लोकमान्य’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती. अभिनेत्री म्हणूनच कायम चर्चेत राहणारी स्पृहा, ती एक उत्तम कवी, लेखिका, सुत्रसंचालिका आहे. स्पृहाने आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज या चारही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या स्पृहाची कविता खूपच चर्चेत आली आहे. (Entertainment News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.