Viral Video: व्हायरल व्हिडिओनंतर पुन्हा स्पॉट झाले हे कपल, तमन्ना भाटिया-विजय वर्माला एकत्र पाहून फॅन्स हैराण

तमन्ना आणि विजय सध्या चर्चेत असलेले कपल आहे.
Viral Video: व्हायरल व्हिडिओनंतर पुन्हा स्पॉट झाले हे कपल, तमन्ना भाटिया-विजय वर्माला एकत्र पाहून फॅन्स हैराण
Saam Tv

Tamanna Bhatia Vijay Verma Viral Video: गोव्यातील नवीन वर्षानिमित्त एका पार्टीत तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एकत्र दिसले होते. आठवड्यांनंतर, दोघेही रविवारी मुंबईत एका पुरस्कार सोहळ्यात एकत्र दिसले आहेत. इव्हेंटमध्ये ते दोघे एकत्र दिसले तसेच त्यांनी पापाराझीसाठी एकत्र पोजही दिल्या. त्यांचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तमन्ना आणि विजय सध्या चर्चेत असलेले कपल आहे. त्यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडत आहे.

इव्हेंटमध्ये फोटोसाठी पोज देतानाचा व्हिडिओ एका पापाराझीने शेअर केला आहे. यामध्ये तमन्ना भाटिया निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या ट्रॉफीसोबत एकटीच पोज देताना दिसत आहे. मग विजय वर्मा फ्रेममध्ये येतो कारण ते दोघे एकमेकांच्या पुढे-मागेच असतात. विजय तमन्नासाठी फोटो काढण्यासाठी थांबतो. दोघे एकत्र पोज देतात. यावेळी विजय रंगीबेरंगी जॅकेट आणि काळ्या रंगाच्या डेनिममध्ये दिसत आहे.

Viral Video: व्हायरल व्हिडिओनंतर पुन्हा स्पॉट झाले हे कपल, तमन्ना भाटिया-विजय वर्माला एकत्र पाहून फॅन्स हैराण
Sidharth Malhotra: सिद्धार्थचा लूक पाहून नेटकरी संतापले, म्हणाले, बॉलिवूड कधी सुधारणार?

तमन्ना आणि विजय त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडत आहे. मात्र, अनेकांच्या त्यांच्या एकत्र असणं अनेकांना खटकत आहे. एका चाहत्याने म्हटलं आहे, 'ते एकत्र खूप क्यूट दिसतात.' तर दुसऱ्याने म्हटले आहे, 'ते एक चांगले कपल आहे.' तिसऱ्या युजरने म्हटले आहे, "हे एक उत्तम जोडपे आहे."

एका युजरने व्हिडीओवर कमेंट केली की, 'मला या जोडीने खूप आश्चर्यचकित केले आहे. ती एक चांगली अनुभवी कलाकार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काळ इंडस्ट्रीत आहे. हा माणूस एक नवीन अभिनेता आहे. तिला पाहून मला मला नेहमी वाटायचे की तिचा जोडीदार एक श्रीमंत उद्योगपतीच होईल. त्यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'तो तमन्नापेक्षा खूपच चांगला अभिनेता आहे.'

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तमन्ना आणि विजय 2023 साली गोव्यातील एका पार्टीत एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटताना दिसले होते. पार्टीत एकत्र डान्स करताना दोघेही मिठी मारत एकमेकांना किस केले होते. काही दिवसांनी ते मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते.

33 वर्षीय तमन्ना हिने 2005 मध्ये 'चांद सा रोशन चेहरा' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ती तामिळ आणि तेलगू चित्रपट इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. 'बाहुबली' चित्रपटातील तिची भूमिका तिच्या सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक आहे. 36 वर्षीय विजयने 2012 मध्ये चितगावमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि 'गली बॉय'मधून प्रसिद्धी मिळवली. नेटफ्लिक्स वरील डार्लिंग्स चित्रपटामध्ये आलिया भट्टसह तो दिसला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com