
KRK On Adipurush Box Office Collection Prediction: ओम राऊत दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित ‘आदिपुरुष’ चित्रपट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटात प्रभू श्री रामांच्या भूमिकेत प्रभास, जानकी सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन तर लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग दिसणार आहे. तर चित्रपटाची घोषणा झाल्याबरोबर नेहमीच ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या सैफ अली खानने चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. दरम्यान, ट्रेड ॲनालिस्ट कमाल राशिद खान उर्फ केआरकेने पहिल्या दिवशी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट किती कमाई करेल याचा खुलासा केला आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपट येत्या १६ जून २०२३ ला बॉक्स ऑफिसवर जगभरात प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा सोशल मीडियावर ट्रेलर प्रदर्शित झाला होता, एका दिवसातच चित्रपटाने ५० मिलियनचा टप्पा पार केला होता. दरम्यान, ट्रेड ॲनालिस्ट कमाल राशिद खान उर्फ केआरकेने नुकतेच एक ट्वीट शेअर केले आहे.
केआरकेनं केलेल्या ट्विटनुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपट एकट्या भारतात पहिल्याच दिवशी १५० कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. तर, पहिल्या आठवड्यातच १००० कोटींचा व्यवसाय करू शकतो. शाहरुखपेक्षा प्रभासची दाक्षिणात्य भारतात जास्त क्रेझ आहे. आता केआरकेनं बांधलेला हा अंदाज खरा ठरतो की सपशेल खोटा ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘आदिपुरुष’ थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी, न्यूयॉर्कमधील २०२३ ट्रायबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. चित्रपट भव्य दिव्य स्वरूपात दाखवण्याचं अश्वासन दिग्दर्शक ओम राऊत यांनी पीटीआयच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिले होते, त्यावेळी ओम राऊत म्हणाले होते, आव्हाने नेहमीच असतात, परंतु त्यामुळेच आमचा सिनेमा चांगला होईल आणि त्याचा प्रवास अधिकच मजबूत होईल, याची मला शाश्वती आहे. हा पहिला भारतीय सिनेमा आहे, ज्यामध्ये हॉलिवूडमधील अनेक तंत्राचा वापर करून हा चित्रपट बनवला आहे.
‘आदिपुरुष’मध्ये व्हीएफएक्सवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार प्रभासने चित्रपटासाठी तब्बल 150 कोटी रुपये इतके मानधन स्विकारले असून क्रिती सेनॉनने ३ कोटी रुपये मानधन स्विकारले. तर आणखी एक मुख्य बाब म्हणजे, सैफ अली खानने या चित्रपटासाठी जवळपास १२ कोटी इतकं मानधन स्विकारले. सध्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.