Jay Shri Ram Song: ‘आदिपुरूष’ मधील अजय- अतुलने स्वरबद्ध केलं ‘जय श्री राम’; अंगावर शहारे आणणारे गाणं प्रदर्शित

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर आज चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
Adipurush Film Jay Shri Ram Song
Adipurush Film Jay Shri Ram SongInstagram @kishorepoudala

Aadipurush Film New Song: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे. येत्या १६ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटातील आज पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचे बोल ‘जय श्री राम’ असे आहेत. या गाण्यातून श्रीराम भक्तीचा जागर होणार आहे. चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, सनी सिंह, देवदत्त नागे आणि सैफ अली खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

Adipurush Film Jay Shri Ram Song
Satish Kaushik Wife Defamation Case: सतीश कौशिक यांना त्यांच्या बायकोनेच मारलं असा दावा करणाऱ्या 'त्या' महिलेला कोर्टाने पाठवले समन्स

‘जय श्री राम’ हे ‘आदिपुरूष’मधलं पहिलं गाणं असून या गाण्याने सोशल मीडियावर प्रदर्शित होताच चांगलाच चर्चेत आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसह, टीझरच्या बॅकग्राऊंडला चालणाऱ्या या गाण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर आज दुपारी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. चित्रपटाचे संगीतकार आणि गायक अजय- अतुल यांच्या उपस्थितीत हे गाणं आज भव्य दिव्य पद्धतीने प्रदर्शित करण्यात आलं. ‘जय श्री राम’ हे गाणं ऐकताच क्षणी अंगावर अक्षरशः शहारे येतात. अजय- अतुलच्या संगीताने नेहमीप्रमाणे या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राम भक्तांचे मन जिंकलं आहे.

या गाण्याबद्दल सांगायचे तर, प्रसिद्ध गीतकार मनोज मुनतासीर यांनी लिहिले आहे तर अजय-अतुल या शानदार जोडीने गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. हे या चित्रपटातील पहिले गाणे असून लवकरच इतर गाणे देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रभास, क्रिती सेनन, सनी सिंह, देवदत्त नागे आणि सैफ अली खान हे सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com