Ram Siya Ram Song Released : आदिपुरुषमधील 'राम सिया राम' गाणे प्रदर्शित; राम-सीता यांच्या हृदयस्पर्शी प्रेमकथेने जिंकली लाखों मने

Adipurush New Song: 'आदिपुरुष' मधील 'राम सिया राम' हे दुसरे गाणे आज प्रदर्शित झाले आहे.
Ram Siya Ram  Song Get Big Hit
Ram Siya Ram Song Get Big HitSaam TV

Ram Siya Ram Song From Adipurush Released: कृती सेनन आणि प्रभास स्टारर 'आदिपुरुष' मधील 'राम सिया राम' हे दुसरे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आज प्रदर्शित झालेल्या या गाण्यात भगवान श्री राम आणि माता सीता यांची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. या गाण्यात राम आणि सीतेचे प्रेम आणि वेगळेपण खूप सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच व्हायरल देखील झाले आहे.

'राम सिया राम' हे गाणे टी-सीरीजने यूट्यूबवर प्रदर्शित केले आहे. हे गाणे सचेत-परंपरा यांनी गायले आहे. यासोबतच या गाण्याचे संगीतही सचेत टंडन आणि परंपरा टंडन या जोडीने दिले आहे. हे गाणे चित्रपटाचे प्रमुख कलाकार प्रभास आणि क्रिती यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. मनोज मुंतशिर शुक्ला यांनी हे गाणे लिहिले आहे. (Latest Entertainment News)

Ram Siya Ram  Song Get Big Hit
Manoj Bajpayee Movies: मनोज वाजपेयीला फक्त एकाच गोष्टीची खंत; बाप बॉलिवूडचा स्टार, पण लेकीला...

चित्रपटातील गाणे हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याच्या प्रदर्शनाची माहिती क्रिती सेननने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, 'आदिपुरुष की आत्मा राम सियाराम.' हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

या गाण्याला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोघांचा लूकही खूप पसंत केला जात आहे. एका यूजरने लिहिले की, 'श्रीरामच्या भूमिकेत प्रभास आणि सीताजीच्या भूमिकेत कृती....परफेक्ट मॅच.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'पावित्र्य आणि सौंदर्य डोळ्यांतून प्रतिबिंबित होते. महान गाणे. एका यूजरने लिहिले की, 'मी हे गाणे सतत ऐकत आहे, हे खूप रिलॅक्सिंग गाणे आहे.'

हे गाणे यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे ३० लाख लोकांनी पाहिले आहे. रामायणावर आधारित आणि ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सनी सिंग या चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारणार आहे. तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com