Adipurush Trolled: रावणानंतर सीतेचं पात्र साकारणारी क्रिती झाली ट्रोल, पोस्टरमधली ती एक गोष्ट खटकली...

सैफ अली खाननंतर आता कृती सनॉनच्या लूकवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सीता मातेच्या भांगेत सिंदूर का दाखवला नाही, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.
Adipurush Film Poster Trolled
Adipurush Film Poster TrolledInstagram

Adipurush Film Poster Trolled: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत नवीन पोस्टर रिलीज केले. पोस्टरमध्ये रामच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त दिसत आहे. हे पोस्टर पाहून पुन्हा एकदा ‘आदिपुरूष’ची चर्चा सुरू झाली. यावेळी पुन्हा युजर्सनी या पोस्टरवर आक्षेप घेतला असून काहींनी निर्मात्यांनी बदल केले नसल्याचा आरोप केला आहे.

Adipurush Film Poster Trolled
Salman Khan New Song: तेलंगणातील अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडणार; 'किसी का भाई किसी की जान'मधील नवे गाणे प्रदर्शित

‘आदिपुरूष’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचा बराच वाद झाला होता आणि अनेक गुन्हेही दाखल झाले होते. सैफ अली खानने चित्रपटात रावणाची भूमिका साकारली होती, त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. त्याच्या लांब दाढीची तुलना मुघलांशी केली जात होती. हा वाद इतका विकोपाला गेला की निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखच बदलली. एवढेच नाही तर दिग्दर्शकाने या चित्रपटात काही बदल करण्यासही सुरुवात केली होती, त्यानंतर चित्रपटाच्या वाढलेल्या बजेटबद्दल ऐकून लोकांना धक्का बसला.

रामनवमीनिमित्त चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर पोस्टर पाहताच नेटकऱ्यांनी त्यातील चुका शोधण्यास सुरुवात केली. अनेकांनी हनुमान, राम, सीता आणि लक्ष्मणाच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. सैफ अली खाननंतर आता कृती सनॉनच्या लूकवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सीता मातेच्या भांगेत सिंदूर का दाखवला नाही, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.

‘कलाकारांवर कोणताच राग नाही, कारण त्यांची काही चूक नाही. पण हा पोस्टरसुद्धा मनाला भावत नाही’ असं एका नेटकऱ्याने कमेंट करत उत्तर केले आहे. ‘प्रभासने हा प्रोजेक्ट सोडून द्यावा’ असं एका युजरने म्हटलंय. ‘संस्कृती मस्करी का करताय’ असा संतप्त सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. आदिपुरुषच्या पोस्टरचं एडिटिंग नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. त्यावरूनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Adipurush Film Poster Trolled
Taali: गौरी सावंत आणि सुष्मिता सेनने वाजवली ‘ताली’; वर्ल्ड ट्रान्सजेंडर डेच्या निमित्ताने व्हिडीओ चर्चेत

‘आदिपुरूष’ हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, पण टीझर प्रदर्शनानंतर करण्यात आलेल्या टीकेमुळे निर्मात्यांसोबतच दिग्दर्शकांनाही चांगलेच ट्रोल केले आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर निर्मात्यांवर चौफेर टीका व्हायला लागली. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवल्यामुळे चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्समध्ये आणखी बदल करण्याचा निर्णय घेतला. व्हिएफएक्समध्ये बदल केल्यानंतर १६ जून रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com