कधी करताय काकांशी लग्न? आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर फातिमा होतेय 'ट्रोल'

आमिर-किरण यांचा घटस्फोट झाल्यानंतर लोकांनी फातिमाला ट्रोल करणे सुरु केले. अद्यापही तिला तिच्या पोस्ट खाली ट्रोलिंग करणे सुरू आहे. फातिमानं नुकताच एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी फोटो शेअर केला होता. त्यावर लोकांनी आमिरबद्दल प्रश्न विचारून तिला भंडावून सोडलं आहे.
कधी करताय काकांशी लग्न? आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर फातिमा होतेय 'ट्रोल'
कधी करताय काकांशी लग्न? आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर फातिमा होतेय 'ट्रोल'Saam Tv

पुणे : बॉलिवूड अभिनेता आमिर खान Aamir Khan आणि किरण राव Kiran Rao या दोघांनी अचानक घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. घटस्फोटाच्या निर्णयाचे कारण काय हे अद्याप समजले नाही. पण हो या घटस्फोटाचा थेट संबंध बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख Fatima Sana Shaikh हिच्याशी जोडला जातो. दंगल चित्रपटापासून फातिमा व आमिरचं नाव जोडलं जात होत. आमिर-किरण यांचा घटस्फोट झाल्यानंतर लोकांनी फातिमाला ट्रोल करणे सुरु केले. अद्यापही तिला तिच्या पोस्ट खाली ट्रोलिंग करणे सुरू आहे. फातिमानं नुकताच एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी फोटो शेअर केला होता. त्यावर लोकांनी आमिरबद्दल प्रश्न विचारून तिला भंडावून सोडलं आहे.

आमिर खान सोबत लग्न कधी करताय मॅडम तुम्ही? काकांशी लग्न कधी करत आहेत? असे प्रश्न अनेकांनी तिला विचारले आहेत.
अचानक आमिर आणि फातिमाच्या अफेअरच्या चर्चा दंगल’ सिनेमानंतर सुरु झाल्या होत्या. या दोघांची जवळीक पाहून किरण नाराज असल्याच्याही चर्चा रंगात होत्या. मात्र या सगळ्या अफवा आहेत असे सांगून फातिमाने पुढे यावर बोलणं टाळलं होते.

कधी करताय काकांशी लग्न? आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर फातिमा होतेय 'ट्रोल'
कधी करताय काकांशी लग्न? आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर फातिमा होतेय 'ट्रोल'Saam Tv

फातिमा Fatima म्हणाली होती कि, आमिरचं स्थान माझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचं आहे. मात्र लोकांच्या चुकीच्या चर्चांमुळे मला स्वत:वर परिणाम करून घ्यायचा नाही. खुद्द आमिरची पत्नी किरणननेही आमिरसोबतचे फातिमाचे नातं असल्याचं वृत्त फेटाळून लावले होते. आमिरनं मात्र या चर्चांवर कायम चुप्पी राखण्याचा पर्याय निवडला होता. पुन्हा आता इतक्या वर्षानंतर या अफेअरच्या चर्चांना जोर मिळाला आहे. आमिरने घटस्फोटाची घोषणा केली होती त्यावेळेस फातिमा टिष्ट्वटरवर ट्रेंड करत होती.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com