Kiran Mane: किरण मानेंच्या भेटीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले; 'चांगली मालिका बंद होऊ नये'

'मी एकदा भूमिका घेतली त्यातून मी पाय मागे घेत नाही. हा वैचारिक लढा नाही, हा राजकीय अभिनिवेश नाहीये किरण माने हे प्रकरण माझ्यापर्यंत आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली.'
Kiran Mane: किरण मानेंच्या भेटीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले; 'चांगली मालिका बंद होऊ नये'
Kiran Mane: किरण मानेंच्या भेटीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले; 'चांगली मालिका बंद होऊ नये'Saam TV

सुशांत सावंत -

मुंबई : 'मुलगी झाली हो' या मालिकेतील कलाकार किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतुन काढल्याने सुरु झालेला वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आता या वादावर तोडगा काढण्यासाठी राजकीय पातळीवरती मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरु असून या बाबतच आज किरण माने आणि स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेट हेड सतीश राजवाडे हे राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) भेटले.

या भेटीनंतर आव्हाड म्हणाले, 'किरण माने प्रकरणात स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे यांच्यासोबत चर्चा केली असून आम्ही त्यांना विचारले की, 'किरण माने यांना मालिकेतुन काढण्याआधी नोटीस दिली होती का? एखाद्या कलाकाराला बाहेर काढणे हे माणुसकीच्या विरोधातील आहे.' (After the visit of Kiran Mane, jitendra Awadh reacted)

Kiran Mane: किरण मानेंच्या भेटीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले; 'चांगली मालिका बंद होऊ नये'
Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या त्या विधानाबाबतची सुनावणी पुढे ढकलली

मालिका बंद होऊ नये -

दरम्यान स्टार प्रवाहचे (Star Pravah) प्रोडक्शन हाऊसचे लोक येऊन भेटणार असल्याचंही आव्हाडांनी यावेळी सांगितलं शिवाय एका स्त्रीने त्यांच्यावर आरोप केला, पण बाकीच्या स्त्री कलाकारांनी त्यांची बाजू घेतली. एक चांगली मालिका (Series) बंद होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे असं आव्हाड यावेळी म्हणाले.

या खऱ्या जिजाऊंच्या लेकी -

मी एकदा भूमिका घेतली की त्यातून पाय मागे घेत नाही. हा वैचारिक लढा नाही, हा राजकीय अभिनिवेश नाहीये मात्र किरण माने हे प्रकरण माझ्यापर्यंत आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली. तसंच एका प्रोडक्शन हाऊस विरुद्ध महिला कलाकाराने किरन माने याची बाजू घेतली या खऱ्या जिजाऊंच्या लेकी असल्याचं वक्तव्यही आव्हाड यांनी यावेळी केलं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com