प्रतीक्षा संपली! रणबीर आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अनेक चाहते चित्रपटातील व्हीएफएक्सचं कौतुक करत आहेत.
प्रतीक्षा संपली! रणबीर आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Brahmastra TrailerSaam Tv

मुंबई - रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर सध्या याच ट्रेलरची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. 2014 मध्ये या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा होती. पण ही प्रतीक्षा अखेर संपली आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शन या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये रणबीर-आलियाच्या रोमँटिक केमिस्ट्रीसोबतच भरपूर अ‍ॅक्शन देखील पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर हळूहळू रणबीर कपूर आणि आलियाची झलक पाहायला मिळत आहे.

Brahmastra Trailer
बाबो! पहिली पत्नी असताना पतीनं केलं दुसरं लग्न; आता आली पश्चातापाची वेळ

हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर शिवा ही भूमिका साकारत आहेत. तर आलिया भट्ट इशाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि अभिनेत्री मौनी रॉय यांचा देखील दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com