
Bholaa Booking: अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'भोला' चित्रपटातील आजच फर्स्ट लूकच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीच उंचावल्या आहेत. या चित्रपटामध्ये तुम्हाला अॅक्शन, ड्रामा, रोमांच आणि इमोशन सर्वच पाहायला मिळणार आहे.
'भोला' चित्रपटाचे अगदी जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'भोला'च्या ट्रक देशभरातील विविध शहरात दाखल झाला आहे. अजय देवगण आणि तब्बू देखील या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.
या चित्रपटाबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. अजय देवगणने चित्रपटसंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तब्बू आणि अजय देवगण चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असल्याचे सांगितले आहे. आयमॅक्स ३डी आणि ४डी एक्ससाठीचे बुकिंग सुरु झाले असल्याची माहिती अजय देवगणने दिली आहे.
'भोला' चित्रपट ३० मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. सामान्यतः चित्रपटाचे बुकिंग चित्रपट प्रदर्शित व्हायच्या २ ते ३ दिवस आधी सुरू होते. परंतु भोळा चित्रपटाचे बुकिंग १२ दिवस आधीच सुरू झाले आहे. चित्रप्रेमींसाठी हे अनपेक्षित आहेत.
'भोला' चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट 'कैथी'चा रिमेक आहे. 'भोला' चित्रपटाचे दिग्दर्शन देखील अजय देवगणनेच केले आहे. थ्रीडीमध्ये बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.