
Akshay Kumar: बॉलिवूडचा खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमारचा 'सेल्फी' चित्रपट २४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. गेल्या वर्षात त्याने तब्बल पाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. ते जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप झाले होते. काहीजणांनी त्याला चित्रपटसृष्टीतून रिटायर्डमेंटचा सल्ला दिला आहे, तर काहींनी त्याच्या कामावरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण केला. अशातच फ्लॉप चित्रपटांवर अक्षय कुमारने जरा स्पष्टच उत्तर दिले आहे.
नुकताच अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीसोबतचा 'सेल्फी' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर खूपच कमी ओपनिंग मिळाली आहे. त्यानंतर कंगना रणौतनेही चित्रपटाला फ्लॉप म्हटले आहे. अक्षय कुमारचा अखेरचा हिट चित्रपट सुर्यवंशी हा होता. चित्रपटाबद्दल सांगायचे तर, रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या 'सूयवंशी' या चित्रपटाने 198 कोटींचा व्यवसाय करत हिटचा किताब पटकावला. मात्र त्यानंतर अक्षय कुमारचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. दरम्यान, त्याला ओटीटीचाही सहारा घ्यावा लागला आहे.
एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने त्याच्या फ्लॉप चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. यावर अक्षय म्हणतो, " माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडत नाही. माझ्या सिनेकारकिर्दित तब्बल 16 फ्लॉप चित्रपट झाले आहेत. एक काळ असाही होता की, माझे सलग 8 चित्रपट जबरदस्त फ्लॉप ठरले होते. आता ही तशीच वेळ सध्या माझ्यावर आली आहे, सलग ३- ४ चित्रपट माझे फ्लॉप ठरले. या सगळ्यामागे माझी चूक आहे. चित्रपट न चालणे ही सर्वस्वी माझी चूक आहे. आता प्रेक्षक बदलले आहेत. त्यामुळे कलाकारांनाही बदलत्या पिढीनुसार बदलावे लागेल. जर त्यांच्या गरजा बदलल्या असतील तर तुम्हालाही त्यानुसार काम करावे लागेल."
आपल्या करिअरबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणतो, "हा काळ माझ्यासाठी धोक्याचा आहे. तुमचा चित्रपट चालत नसेल तर तो तुमचा दोष आहे. मला जे शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न करतोय. मी सर्वांना सांगू इच्छितो की, जर तुमचे चित्रपट चांगले चालत नसतील तर तुम्ही प्रेक्षक किंवा इतर कोणालाही दोष देऊ शकत नाही. ही माझी चूक आहे. 100 टक्के. तुमचे चित्रपट चालत नसल्यास याचा अर्थ तुम्ही काय निवडत आहात. तुमच्या चित्रपटात सर्व काही योग्य प्रमाणात नसल्याने ते अयशस्वी होत आहे."
अक्षय कुमारचा गेल्या काही दिवसांपुर्वी 'सूर्यवंशी'हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज, रामसेतू ते सेल्फीपर्यंतच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम मिळालेले नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.