आईची तब्येत बिघडली, शुटींग सोडून अभिनेता Akshay Kumar मुंबईत दाखल

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची तब्येत खूपच गंभीर आहे.
आईची तब्येत बिघडली, शुटींग सोडून अभिनेता Akshay Kumar मुंबईत दाखल
आईची तब्येत बिघडली, शुटींग सोडून अभिनेता Akshay Kumar मुंबईत दाखलSaam Tv

मुंबई : अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची तब्येत खूपच गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मुंबई मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आईची प्रकृती खूपच गंभीर असल्याची बातमी समजल्यानंतर अक्षय कुमार लगेचच लंडनहून मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया मागील काही दिवसांपासून मुंबई मधील हिरानंदानी रुग्णालयात दाखल आहेत.

हे देखील पहा-

तिथे त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत. अक्षय कुमार त्याच्या सिंड्रेला या सिनेमाच्या चित्रीकरणाकरिता लंडनला होता. आईची प्रकृती गंभीर असल्याची बातमी मिळाल्यानंतर तो तातडीने चित्रीकरण अर्धवट सोडून मुंबईत दाखल झाला आहे.अक्षय आणि त्याच्या आईमध्ये खास नाते आहे. यामुळेच आईच्या आजारपणाची बातमी मिळाल्यानंतर तो लगेचच मुंबईला आला आहे. काही आठवड्या अगोदर अक्षय त्याच्या आगामी सिंड्रेला या सिनेमाच्या चित्रीकरणाकरिता परदेशी गेला होता.

आईची तब्येत बिघडली, शुटींग सोडून अभिनेता Akshay Kumar मुंबईत दाखल
शुटींग दरम्यान भयानक अपघात; मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले

परंतु, आईच्या प्रकृतीची बातमी समजल्यावर तो आईसोबत राहण्याकरिता म्हणून तातडीने मुंबईला परतला आहे. दरम्यान, त्याने निर्मात्यांना ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही. ती दृश्ये चित्रीत करावी असे सांगितले आहे. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या आहेत. काही वर्षा अगोदर त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे. अरुणा भाटिया या देखील सिनेमा निर्माते होते. त्यांनी हॉलिडे, नाम सबनम आणि रुस्त या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली होती.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com