Bell Bottom: अक्षयच्या नविन चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार खास अनुभव

....त्याअगोदरच आता 'बेल बॉटम' Bell Bottom बद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
Bell Bottom: अक्षयच्या नविन चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार खास अनुभव
Bell Bottom: अक्षयच्या नविन चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार खास अनुभवTwitter

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे (Bollywood Actor Akshay Kumar) अनेक चित्रपट रिलीजसाठी प्रतिक्षेत आहेत. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) झालेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) त्याच्या बरेच चित्रपट रिलीजच्या तारखेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यापैकी अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' (Bell Bottom) चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच आता 'बेल बॉटम' बद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

हा चित्रपट थ्रीडी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी वेबसाइट च्या वृत्तानुसार ‘बेल बॉटम’ च्या निर्मात्यांनी लवकरच हा चित्रपट 3 डी व्हर्जनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तिवारी यांनी केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती निखिल आडवाणी यांनी केली आहे. चित्रपटगृहात अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हा चित्रपट 3 डी व्हर्जनमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Bell Bottom: अक्षयच्या नविन चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार खास अनुभव
T-20 World Cup: पहिले 6 सामने 'या' देशात खेळवले जाणार

असे झाल्यास ‘थ्रीडी’ मध्ये प्रदर्शित होणारा अक्षय कुमारचा हा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी त्याचा 2.0 चित्रपट हा चित्रपट 2018 साली थ्रीडी मध्ये रिलीज झाला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अक्षयचा 'बेल बॅटम' हा पहिला चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट लगेच OTT नर रिलीज होणार आहे. यासाठी अॅमेझॅान प्राईमने 30 कोटी रुपयाची ऑफर दिली आहे.

हा चित्रपट यापूर्वी 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे प्रकाशन पुढे ढकलले गेले. नुकताच या चित्रपटाचा टीझर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, 'मला माहित आहे तुम्ही लोक बेलबॉटमची संयमाने वाट पाहत आहात. चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करणे यापेक्षा आनंददायक आणखी काय असू शकते. हा चित्रपट 27 जुलै रोजी जगभरातील मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. बेलबॉटमची निर्मिती पूजा एंटरटेनमेंटने केली आहे, तर दिग्दर्शक रणजित तिवारी आहेत. या गुप्तचर अ‍ॅक्शन-थ्रीलर चित्रपटात वाणी कपूर मुख्य भूमिकेत असून लारा दत्ता आणि हुमा कुरेशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com