अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित Saam Tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगले यश मिळाले. सगळीकडेच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असताना अक्षयच्या दुसऱ्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या टीझरला तुफान पसंती मिळत आहे.

हे देखील पहा-

‘पृथ्वीराज’ हा चित्रपट महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटामध्ये ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याबरोबरच सिनेमात संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाच्या टीझरवरून या सिनेमाची भव्यता आपल्या लक्षात येणार आहे. टीझरमधील युद्धभूमीवर सज्ज असलेले योद्धे, पेटलेले रणांगण आणि दमदार डायलॉग प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेणार आहेत. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
अमरावतीत पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये शहरात धरपकड सुरू

येत्या नव्या वर्षामध्ये म्हणजेच २१ जानेवारी २०२२ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. येत्या नव्या वर्षात अक्षय कुमार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पूर्णपणे सज्ज आहे. ‘पृथ्वीराज’ सिनेमाबरोबरच तो ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’, ‘राम सेतु’, ‘रक्षा बंधन’, ‘मिशन सिंड्रेला’ आणि ‘ओ माय गॉड’ या सिनेमांमधून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com