अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

अक्षय कुमार यांनी ट्विट करुन सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले.
अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला
अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' प्रदर्शनाचा मुहूर्त ठरलाTwitter/@akshaykumar

मुंबई - राज्यात आता शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह आणि नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने State Government घेतला आहे. राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह २२ ऑक्टोबरपासून October सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे, आता लवकरच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील जाहीर होणार असल्याचे दिसून येते. कारण चित्रपटगृह सुरु होणार अशी घोषणा होताच रोहित शेट्टी Rohit Shetty आणि अक्षय कुमारसह Akshay Kumar तगडी स्टारकास्ट असलेला सूर्यवंशी Sooryavanshi चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अडकलेला हा चित्रपट आतादिवाळीत प्रदर्शित होणार आहे. कालचं राज्य सरकारने येत्या २२ ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडण्याचे निर्णय घेतला आणि त्यानंतर निर्माता रोहित शेट्टी यांनी सुर्यवंशी चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. अक्षय कुमार यांनी ट्विट करुन सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. चित्रपटात अक्षय एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 30 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर, 15 ऑगस्टच्या तारखेचीही चर्चा झाली. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती आता मात्र हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com