Siddharth Shukla: खिलाडी कुमारचीही सिद्धार्थला श्रद्धांजली

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे.
Siddharth Shukla: खिलाडी कुमारचीही सिद्धार्थला श्रद्धांजली
Siddharth Shukla: खिलाडी कुमारचीही सिद्धार्थला श्रद्धांजलीSaam Tv

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याचा मृत्य झाला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज दुपारी १२.३० वाजता शवविच्छेदन अहवाल येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. छोट्या पडद्यावरचा मोठा अभिनेता म्हणून त्याची ओळख होती. कूपर हॉस्पिटलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

त्याच्या अचानक जाण्याने सर्वांना दुःख अनावर झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त ते दुःख करत आहेत. ट्विटरवर तर त्याच्या चाहत्यानीं दुःख व्यक्त करताना सिद्धार्थच्या आठवणींचा पाऊसच पाडला आहे.

तर बॉलिवूडचा खिलाडी यानेही सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्विट करून लिहिले की, सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनाबद्दल जाणून घेऊन खूप वाईट वाटले. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो पण इतक्या प्रतिभावान आयुष्याने इतक्या लवकर निघून जाणे मनाला तोडणारे आहे. ओम शांती

बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या नवोदित अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने Heart Attack त्याचे निधन झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com