Akshay Kumar: अरे वयाचा तरी विचार कर... अक्षय अन् नोराचा डान्स पाहून नेटकरी संतापले

अक्षय आणि नोराचा डान्स पाहून नेटकरी बरेच संतापले.
Akshay Kumar And Nora Fatehi Viral Video
Akshay Kumar And Nora Fatehi Viral VideoInstagram/ @akshaykumar

Akshay Kumar Trolled: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'सेल्फी' चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा हा सलग चौथा चित्रपट आहे, जो वाईटरित्या फ्लॉप झाला आहे. याशिवाय अक्षय कुमार त्याच्या 'द एंटरटेनर्स' या आंतरराष्ट्रीय टूरमुळेही चर्चेत आहे. अभिनेता अलीकडेच सोनम बाजवा, दिशा पटानी, नोरा फतेही, अपारशक्ती खुराना आणि मौनी रॉय यांच्यासोबत विमानतळावर दिसला होता, आता टूरच्या पहिल्या शोमधील अक्षय आणि नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरुन त्याला बरेच ट्रोल केले जाते.

Akshay Kumar And Nora Fatehi Viral Video
Urfi Javed Fashion: उर्फीची नवी स्टाईल पाहून म्हणाल, केवड्याच्या बनात नागीन सळसळली!

अक्षय कुमारने अलीकडेच त्याच्या 'द एन्टरटेनर्स' टूरला अटलांटामधील (Atlanta) पहिल्या शोने सुरुवात केली. शेवटच्या दिवशी कलाकारांनी अमेरिकेतील अटलांटा येथे परफॉर्मन्स केला. हा कार्यक्रम हाऊसफुल्ल असला तरी त्याच्या व्हिडिओ भारतात सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. अक्षय कुमार आणि नोराच्या लाइव्ह परफॉर्मन्सच्या व्हिडिओमध्ये खिलाडी कुमार 'सेल्फी' गाण्यावर थिरकला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, स्टेजवर 'गुड न्यूज'मधील 'लाल घाघरा' गाण्यावर आणि त्यानंतर 'सेल्फी'मधील 'मैं खिलाडी तू अनाडी' या गाण्यावर जोशात नाचत आहे. संपूर्ण शोची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये अक्षयने लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये नाचताना दिसत आहे. अक्षयने त्याच्या काळ्या शर्टावर लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. हे लोकांना अजिबात पटत नाही. या व्हायरल व्हिडिओवर अक्षय कुमारच्या या लूकबद्दल नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत.

अक्षय कुमारला घागऱ्यात नाचताना पाहून नेटकरी बरेच भडकले. अभिनेता आत्तापर्यंत त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे ट्रोल होत असताना, आता अशा नृत्यासाठी सर्वजण त्याच्यावर टीका करत आहेत. 

अक्षय कुमार आणि नोरा फतेहीचा हा डान्स पाहून नेटकरी त्यांचा संताप सोशल मीडियावर व्यक्त करीत आहे. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ' आता हेच बघायचे बाकी होते.' तर आणखी एक म्हणतो, 'अक्षय कुमार त्याच्या वयानुसार कधी वागेल काय माहित.' तर आणखी एक नेटकरी म्हणतो, 'अक्षयने या वाईट गोष्टी करणे थांबवले तर अक्षय नक्की हिट होईल.' याहून अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com