Ali Fazal Attends 'Fast X' Premiere: 'मिर्झापूर'च्या गुड्डूची 'Fast X'च्या मेगा प्रीमियरमध्ये हजेरी; व्हिडिओ शेअर करत केली महत्त्वाची घोषणा

Ali Fazal With Vin Diesel: अलीने फास्ट एक्सच्या मेगा प्रीमियरचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
Ali Fazal Attends 'Fast X' Premiere:
Ali Fazal Attends 'Fast X' Premiere: Saam TV

Ali Fazal Attends 'Fast X' Premiere In Rome: अली फजलने फास्ट अँड फ्युरियस 7 मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तो विन डिझेलसोबत दिसला होता. याशिवाय त्याने चित्रपटात पाश्चिमात्य देशातील अनेक बड्या कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.

अलीकडेच अभिनेता पुन्हा एकदा विन डिझेलसोबत दिसला. अलीला फास्ट एक्सच्या वर्ल्ड प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. हा मोठा कार्यक्रम रोममध्ये आयोजित करण्यात आला होता, जिथे विन आणि अली एकमेकांना भेटले. (Latest Entertainment News)

Ali Fazal Attends 'Fast X' Premiere:
Raghav Chadha Share Post: 'तुमच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत...' राघव-परिणितीने मानले चाहत्यांचे आभार

या भेटीत फ्युरियस 7 चे दोन्ही कलाकार खूप खुश दिसत होते. अलीने फास्ट एक्सच्या मेगा प्रीमियरचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. तसेच, त्याने कॅप्शनमध्ये विन डिझेलचे भरभरून कौतुक केले आहे.

त्याने हॉलिवूड स्टार विन डिझेलसाठी लिहिले आहे, "विन डिझेल. तुम्ही माझ्या परिचयाचे सर्वात दयाळू व्यक्ती आहात आणि तुम्ही फास्ट फॅमचा आत्मा आहात. मला या टीमचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. तसेच अली फझलने 'फास्ट एक्स'मध्ये काम काम केले नसल्याचेही सांगितले आहे.

अली बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये खूप सक्रिय आहे. तो लवकरच 'कंधार' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट रिक रोमन वॉ दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट 26 मे 2023 रोजी अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.

अलीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. फुकरेमधील त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती. याशिवाय खामोशियांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांना खूप इम्प्रेस केले.

मिर्झापूर या वेबसीरीज मादक त्याचे गुड्डू पंडित हे पात्र देखील खूप गाजलं होत. तर काही महिन्यांपूर्वी अली फझलचे अभिनेत्री रिचा चड्ढाशी लग्न झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com