Alia-Ranbir Daughter Name: आलिया-रणबीरने अखेर सांगितले मुलीचे नाव, जाणून घ्या काय आहे तिच्या नावाचा अर्थ?

रणबीर आणि आलियाने शेवटी त्यांच्या मुलीचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
Alia Bhatt And Ranbir Kapoor name their Daughter
Alia Bhatt And Ranbir Kapoor name their Daughter Saam Tv

Alia-Ranbir Share Their Daughter Name: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगी झाली. जेव्हापासून या जोडप्याने त्यांच्या मुलीचे स्वागत केले आहे तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या छोट्या परीचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता होती. रणबीर आणि आलियाने शेवटी त्यांच्या मुलीचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्यांच्या मुलीचे नाव फारच सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. तसेच ते ऋषी कपूर यांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचे देखील म्हटले जात आहे.

Alia Bhatt And Ranbir Kapoor name their Daughter
Vicky Kaushal: विकी कौशलने वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, फोटो शेअर करत केली भावनिक पोस्ट

आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक गोड पोस्ट शेअर केली आहे. त्या फोटो पोस्टमध्ये आणि कॅप्शनमध्ये तिने बाळाचे नाव सांगितले आहे. आलिया रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आलियाने या पोस्टला कॅप्शन लिहिले आहे की, “राहा (तिच्या हुशार आणि सुंदर आजीने हे नाव निवडलेले) नावाचे खूप सुंदर अर्थ आहेत… राहा, म्हणजे दैवी मार्ग, स्वाहिलीमध्ये ती आनंद आहे, संस्कृतमध्ये राहा हे एक कुळ आहे. बंगालीमध्ये - आराम, निश्वास, तर अरबीमध्ये याचा अर्थ आहे शांतता. आनंद, स्वातंत्र्य आणि समाधान असाही राहाचा अर्थ आहे. धन्यवाद राहा, आमच्या कुटुंबाला जिवंत केल्याबद्दल, असे वाटते की आमचे आयुष्य आताच सुरू झाले आहे.

आलियाने पोस्ट शेअर करताच त्याच्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेक चाहते आणि आलिया रणबीरचे बॉलिवूडमधील फ्रेंड लाल हार्टचा ईमोजी कमेंट करत आहेत. यासगळ्यात अभिनेत्री आणि राहाची आत्या करीन कपूर हिने देखील कमेंट केली आहे. तिने कमेंटमध्ये लिहिले आहे की, राहा कपूर मी तुला कधी जवळ घेतेय असं झालाय, अजून वाट नाही बघू शकत.' (Bollywood)

आलियाने एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत त्यांच्या घरी वास्तू येथे काही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसमोर लग्न केले. लग्नाआधी हे स्टार जोडपे पाच वर्षांहून अधिक काळ डेट करत होते. त्यांची लव्ह स्टोरी अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रच्या सेटवर सुरू झाली, हा त्यांचा पहिला एकत्र चित्रपट होता. जूनमध्ये आलियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या गरोदर असल्याचे सांगितले. तर नोव्हेंबरमध्ये तिने त्यांच्या मुलीला जन्म दिला. (Celebrity)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com