
Alia Bhatt Pregnancy News : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यानंतर म्हणजेच जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये 2022 तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता आलिया पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. (Latest Marathi News)
आलिया भट्टची (Alia Bhatt) मुलगी राहा आता दोन महिन्यांची झाली आहे. आतापर्यंत तिने राहाचा चेहरा आपल्या चाहत्यांना दाखवलेला नाही. मात्र, नुकताच आलियाने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे या व्हिडिओमुळे चाहत्यांना तिच्या गरोदरपणावरून प्रश्न पडला आहे.
आलियाच्या पोस्टमध्ये आहे तरी काय?
आलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये (Video) तिच्या हातात दोन फुलं दिसत आहेत. हे फुलं तिने अशा पद्धतीने हातात धरले आहेत, ज्यावरून ती ‘2’ हा आकडा दाखवण्याचा प्रयत्न करतेय, असा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘2.0 स्टे ट्युन्ड’.
आलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे आणि त्याला दिलेल्या कॅप्शनमुळे ती पुन्हा गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘दुसरं बाळ येणार आहे का’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘ब्रह्मास्त्र 2.0’ची घोषणा होणार आहे का, असं दुसऱ्याने म्हटलंय. नेमकी कोणती घोषणा करणार आहेस, याची फार उत्सुकता आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.