1 Years Of Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ची वर्षपूर्ती, दिग्दर्शकांनी चाहत्यांना दिली ‘ब्रह्मास्त्र २’ची हिंट

Brahmastra Sequel Announcement: दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल चाहत्यांना थोडक्यात माहिती दिली आहे.
Brahmastra Sequel Announcement Director Ayan Mukharji
Brahmastra Sequel Announcement Director Ayan MukharjiSaam Tv

Brahmastra Sequel Announcement Director Ayan Mukharji

आयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. नुकतच चित्रपटाला प्रदर्शित होऊन वर्ष झालं आहे. चित्रपटाच्या वर्षपूर्ती निमित्त दिग्दर्शकांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल चाहत्यांना थोडक्यात माहिती दिली आहे. सोशल मीडियावर दिग्दर्शकांनी सिकवेलची कथा थोडक्यात शेअर केली आहे.

Brahmastra Sequel Announcement Director Ayan Mukharji
Film Producer Arrested: साऊथच्या सुप्रसिद्ध निर्मात्याला फसवणुकीच्या आरोपीखाली अटक, लग्नाचे फोटो झाले होते व्हायरल

चित्रपटाची कथा शेअर करत दिग्दर्शक आयान मुखर्जी म्हणतात, “ ‘ब्रह्मास्त्र २- देव’च्या कामाला सुरुवात. ब्रह्मास्त्र २ आणि ब्रह्मास्त्र ३ साठी व्हिजन आणि कथेवर गेल्या काही महिन्यांपासून मी काम करीत आहे.! टीम ब्रह्मास्त्रच्या या खास दिवशी, मला त्याच्या पुढच्या भागाची काही छायाचित्रे शेअर करावीशी वाटली.”

तर त्यापूर्वी सुद्धा दिग्दर्शकाने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये दिग्दर्शकाने प्रेक्षकांचे आभार मानलेय पोस्टमध्ये दिग्दर्शक म्हणतात, “ब्रह्मास्त्रला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रेक्षकांनो तुमच्या सर्व सर्जनशीलता आणि मेहनतीबद्दल धन्यवाद. तसेच चित्रपट निर्मिती करताना आणि त्यातून घेतलेल्या धड्यांबद्दलही धन्यवाद. ब्रह्मास्त्राच्या पुढच्या टप्प्याची झलक मी लवकरच शेअर करेल..”

व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट करत काही मागण्या केल्या आहेत. सध्या दिग्दर्शकाची पोस्टच नाही तर, कमेंटही प्रचंड चर्चेत आली आहे. आयान मुखर्जीच्या पोस्टवर चाहते म्हणतात, ‘ब्रह्मास्त्रच्या सिक्वेलमध्ये दीपिकाला अमृताच्या भूमिकेत आणि रणबीरला देवाची भूमिका द्या.’ तर आणखी एक जण म्हणतो, ‘‘ब्रह्मास्त्र २’मध्ये अस्त्राबद्दल अधिक दाखवा...’ तर अनेकांनी चित्रपटाच्या टीमला वर्षपुर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Brahmastra Sequel Announcement Director Ayan Mukharji
Jawan 3rd Day Collection: शाहरुखच्या ‘जवान’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; तिसऱ्याच दिवशी २०० कोटींचा टप्पा पार

आयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ ब्रह्मास्त्र लॉर्ड ऑफ शिवा’ मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला जरी प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला असला तरी, चित्रपटाने उत्तम कमाई केली होती. दिग्दर्शक चित्रपटाचे सिक्वेल दोन्हीही एकत्र तयार करणार असून चित्रपट एका वर्षाच्या काळाने तो बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित करणार आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २७० कोटींची कमाई केली होती. सोबतच जगभरात ही या चित्रपटाने उत्तम कमाई केली होती. चित्रपटाचा दुसरा भाग २०२६ तर तिसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित करणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com