Darlings : 'डार्लिंग्ज'च्या ट्रेलर लाँचिंगमध्ये आलिया भट्ट दिसत होती 'अशी', इव्हेंटचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या 'डार्लिंग्स' या आगामी सिनेमामुळे व्यग्र आहे. आलिया भट्टच्या डार्लिंग्स या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.
Alia Bhatt
Alia BhattSaam Tv

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) तिच्या 'डार्लिंग्स'(Darlings) या आगामी सिनेमामुळे व्यग्र आहे. आलिया भट्टच्या डार्लिंग्स या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाचा ट्रेलरही रीलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता या सिनेमाचा ट्रेलर रीलीज झाल्यामुळे सिनेमा बघण्यासाठी चाहते खूप उत्साही आहेत. आलिया भट्ट नुकतीच 'डार्लिंग्स'या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटसाठी गेली होती. या इव्हेंटमधील आलियाचा लूक खूपच बदललेला दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्ट दिसत होता. त्यामुळे आलियाचा हा बदललेला लूक पाहून चाहते खूप खूश झाले आहेत.

Alia Bhatt
रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली; मी त्याला अनेकदा कपड्यांविना...

या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये आलिया भट्टच्या चेहऱ्यावरचा प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत होता. तसेच प्रेग्नेंसीमुळे तिचे वजन वाढायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. या इव्हेंटमध्ये आलियाने तिचा बेबी बंप लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. म्हणूनच ट्रेलर लाँचसाठी तिने सैल पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्यामुळे तिचा बेबी बंप थोडाही दिसत नव्हता. आलियाचे इव्हेंटमधील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या कमेंट येत आहेत.

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'डार्लिंग्स' नंतर तिचा आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र: शिवा भाग-१' ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया पहिल्यांदाच पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यासोबत दिग्गज कलाकारही महत्वाची भूमिका साकारणार आहेत. आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'आर.आर.आर.' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com