'शमशेरा'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून पत्नी आलिया भट्ट झाली थक्क...

'शमशेरा' या चित्रपटाचा पोस्टर यशराज फिल्म्सने सोमवारी अधिकृतपणे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.२२ जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये 'शमशेरा' सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'शमशेरा'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून पत्नी आलिया भट्ट झाली थक्क...
Ranbir Kapoor and Alia Bhatt imagesaam tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकताच त्याचा शमशेरा या चित्रपटाचा पोस्टर लीक झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण आता यशराज फिल्म्सने सोमवारी अधिकृतपणे हा पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. या पोस्टरमध्ये रणबीर कपूर हिंसक आणि भयानक दिसत आहे. या पोस्टर मार्फत हा चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित होणार हे देखील सांगण्यात आले आहे. रणबीर कपूरचा हा पोस्टर पाहून त्याचे सर्व चाहते अचंबित झाले आहेत. तसेच रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्टने देखील 'शमशेरा'या चित्रपटातील रणबीरच्या लूकवर प्रतिक्रिया दिली आहे.

Ranbir Kapoor and Alia Bhatt image
अभिनेत्री तापसी पन्नू दिसणार बायोपिकमध्ये, उत्कंठा वाढवणारा ट्रेलर पाहा!

'शमशेरा'चा (Shamshera) अधिकृत पोस्टर प्रदर्शित होताच आलिया भट्टने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा पोस्टर शेअर केला आहे. सांगण्याची गरज नाही की रणबीरचा हा लूक बघून आलियाच्या देखील काळजाचा ठोका चुकला. तिने तिच्या चाहत्यांना गुड मॉर्निंग म्हणत कॅप्शन मध्ये लिहिले की, 'आता ही झाली ना हॉट मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग' त्यापुढे तिने दोन एमोजी देखील शेअर केले आहेत.

Ranbir Kapoor and Alia Bhatt image
'हा' चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही, तर कोर्टात होणार स्क्रिनिंग

'शमशेरा'मधील रणबीर कपूरच्या लूकचे पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी लिहिले की, "शमशेरा'ची ओळख करत आहोत 'एक भयंकर योद्धा आणि त्याच्या समाजाचा रक्षक' आयमॅक्सवर हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये पहा. २२ जुलै रोजी यशराज फिल्म्सच्या ५० व्या वर्धापन दिनासोबत तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये 'शमशेरा' प्रदर्शित होत आहे.

काही दिवसांपूर्वी 'शमशेरा'चा पोस्टर सोशल मीडियावर लीक झाला होता. म्हणून यशराज फिल्म्सने 'शमशेरा'चा ट्रेलर प्रदर्शित करण्याच्या नियोजनामध्ये बदल केल्याचे म्हटले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com