Rocky Aur Rani Ki Prem Kahani च्या सेटवरील 'तो' व्हिडीओ व्हायरल, आलियाच्या लूकने वेधले लक्ष

करण जौहरने काही सेटवरील फोटो शेअर केले आहेत. यामध्येच सेटवरचा आलियाचा शुटींग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Alia Bhatt Image
Alia Bhatt ImageInstagram

Alia Bhatt Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह आगामी काळात रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. नुकतेच आलिया आणि रणबीर चित्रपटाच्या शुटींगसाठी काश्मीरला गेले आहेत. करण जौहरने काही सेटवरील फोटो शेअर केले आहेत. यामध्येच सेटवरचा आलियाचा शुटींग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Alia Bhatt Image
Onkar Bhojane: 'हास्यजत्रा सोडून मी आनंदीत...'ज्यामुळं करिअर घडलं त्यावरच ओंकार थेट बोलला

सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्ट सेटवरचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया आणि रणबीर सध्या काश्मीरच्या गुलमर्ग येथे चित्रपटातील रोमॅंटिक गाणे शूट करण्यासाठी पोहोचले आहेत. ते गाणं चित्रपट निर्माता यश चोप्रा यांना समर्पित आहे. असे असतानाच आता रॉकी और रानी की प्रेम कहानी मधील गाण्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडीओमध्ये आलिया लाल रंगाचा टर्टलनेक स्वेटर आणि ब्लेजरमध्ये दिसत आहे आलियाने नाकामध्ये नोज रिंग देखील घातली आहे. कारमध्ये बसलेली आलिया सुदंर दिसते आहे.

८ जुलै २०२३ ला रॉकी और रानी की प्रेम कहानी ही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी काहीवेळा रॉकी आणि रानी की प्रेम कहानी ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. चित्रपटात आलिया आणि रणवीरशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील दिसणार आहेत. सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Alia Bhatt Image
Dilip Joshi: 'तारक मेहता...' जेठालालच्या जिवाला धोका; नागपूर पोलिसांनीही दिला सावधानतेचा इशारा

आलिया कामांबद्दल बोलायचे तर, रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये आलिया रणबीर एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. तसेच येत्या काळात आलिया जी ले जरा मध्ये कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा सोबत दिसणार आहे. याशिवाय आलियाकडे हॉलीवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोन मध्ये दमदार अभिनय करताना दिसणार आहे. एसएस राजमौलीच्या SSMB29 मध्ये सामील होणार आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com