रणबीर कपूरच्या नात्याबद्दल आलिया म्हणतेय; आमच्या दोंघाचेही....

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी एकमेकांच्या खास नात्याबद्दल सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे
Alia Bhatt And Ranbir Kapoor News
Alia Bhatt And Ranbir Kapoor NewsSaam Tv

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे, बॉलिवूडची ही लोकप्रिय जोडी एकमेकांच्या खास नात्याबद्दल सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. नुकताच अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीरला शिवा आणि आलियाला ईशाच्या व्यक्तिरेखेत चाहते पंसत करत आहेत. ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे प्रमोशन आलिया-रणबीर जोरदार करत होते. दरम्यान, एका संभाषणात आलियाने तिच्या प्रेमळ पतीसोबतच्या नातेसंबंधाबद्दल मोकळेपणाने सांगितले "आमच्या दोघांचेही प्रेम खूप अनोखे आहे" असं तिने म्हटले होते.

Alia Bhatt And Ranbir Kapoor News
कॉमेडीयन राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत होतेय सुधारणा; डॉक्टरांनी दिली ही माहिती

'ब्रह्मास्त्र' मध्ये आलिया-रणबीरसह अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसले होते. यासह प्रेक्षकांना शाहरूख खानचा कॅमिओ रोलही चांगलाच आवडला आहे. या सुपरहिट चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३५० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल चित्रपटातील सर्व कलाकार खूप आंनदी आहेत.

Alia Bhatt And Ranbir Kapoor News
Doctor G Trailer: 'डॉक्टर जी' चा ट्रेलर प्रदर्शित, स्त्रीरोग तज्ज्ञांचा चित्रपटात संघर्ष; ट्रेलर पाहून उडणार हास्याचे फवारे

'ब्रह्मास्त्र' या सुपरहिट चित्रपटात आलिया आणि रणबीर ही जोडी पहिल्यादांच एकत्र दिसली. चाहत्यानां या कपलची केमिस्ट्री आवडली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अलिया पहिल्यांदाच रणबीरसोबत काम करण्याबद्दल बोलली. यावेळी आलियाने त्यांच्या पर्सनल टू प्रोफेशनल आयुष्याबाबत सांगितले. एका प्रश्नाचे उत्तर देताना आलिया म्हणाली, रणबीरसोबत काम करायला आंनद वाटतो.

आलिया आणि रणबीर त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. एप्रिलमध्ये या जोडफ्याने लग्न केले आणि जूनमध्ये आलियाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आंनदाची बातमी देऊन तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. चाहतेही आलिया रणबीरच्या बाळाच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com