Ranbir Alia Romance : आलियासोबतच्या वाईट वागणुकीमुळे ट्रोल झाल्यानंतर, रणबीर प्रेग्नेंट पत्नीसोबत कोझी

आलियाने स्वतःचा आणि तिच्या पती रणबीरचा एक क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Alia Bhatt anf Ranbir Kapoor Image
Alia Bhatt anf Ranbir Kapoor ImageSaam Tv

मुंबई : बॉलिवूडचा चॅाकलेट बॅाय रणबीर कपूरने(Ranbir Kapoor) अभिनेत्री आलिया भट्टसोबत(Alia Bhatt) यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये साध्या पद्धतीने लग्न केले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. आलिया आणि रणबीर गेल्या काही महिन्यांपासून प्रसारमाध्यमांशी खूप संवाद साधत आहेत. कारण त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Alia Bhatt anf Ranbir Kapoor Image
Godavari: 'गोदावरी'ची हॅट्रिक; प्रवाह पिक्चर पुरस्कारात मारली बाजी

या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, रणबीर आणि आलिया एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. परंतु काही काळापासून असे अनेक क्षण टिपले गेले आहेत, ज्यामध्ये रणबीर आलियाकडे दुर्लक्ष करत आहे आणि रणबीरचे त्याच्या पत्नी आलिया सोबतचे वागणे खूपच उद्धट आहे. दरम्यान, आलियाने स्वतःचा आणि तिच्या पती रणबीरचा एक अतिशय क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Alia Bhatt anf Ranbir Kapoor Image
Urfi Javed Video : उर्फी जावेदच्या 'या' नवीन लूकमुळे चालन झालं कठीण, दोन्ही पाय बांधून बनवला असा व्हिडिओ

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. दरम्यान, अलीकडेच अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात रणबीर आलियाला चांगली वागणूक देत नाहीये. एकदा आलिया रणबीरचे विस्फारलेले केस ठीक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने आपले डोके मागे वळवले आणि आलियाला स्वतःपासून दूर ढकलले. तसेच एकदा रणबीरने तिच्या आलियाला एकटे सोडले आणि नंतर आलिया एकटीच निघून गेली.

परंतु,आलिया भट्टने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा पती रणबीर कपूरसोबत कोझी होताना दिसत आहे. आलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये रणबीर आलियाच्या नाकावर किस करत आहे. आलिया हसत आहे आणि दोघांनीही डोळे मिटले आहेत. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असून आलियाने 'होम' असे कॅप्शन लिहिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com