Salman Khan: अनंत- राधिकाच्या साखरपुड्याला भाईजानने केली खास व्यक्तीसोबत स्वॅगमध्ये एन्ट्री...

अनंत आणि राधिकाच्या साखरपुडा सोहळ्याला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Salman Khan And Alizeh Merchant
Salman Khan And Alizeh MerchantSaam Tv

Salman Khan: अनंत आणि राधिकाचा साखरपुडा सोहळा १९ जानेवारीला मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्यावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. अनंत-राधिकाला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खानही त्याच्या भाचीसोबत आला होता. या कार्यक्रमात सलमान फुल स्वॅगमध्ये एंट्री करताना दिसला.

Salman Khan And Alizeh Merchant
Ananta- Radhika Engagement: अनंतने राधिकाला दिली अंगठी खरी, पण अंगठी द्यायला आला खास पाहुणा...

यावेळी साखरपुड्याला सलमान, बहिण अलविरा, आणि मुलगी अलिजेह अग्निहोत्री कार्यक्रमात पोहोचले. नेव्ही ब्लू सिल्क कुर्ता आणि पँटमध्ये सलमान खुपच भारी दिसत होता. सोबतच, त्याची भाची अलिझेह व्हाइट लेहेंग्यातही खूप सुंदर दिसत होती. यादरम्यान सलमानने भाचीसोबत माध्यमांसमोर काही पोज देखील दिल्या. यावेळी त्यांच्यातील नाते कसे आहे, हे देखील दिसून आले.

Salman Khan And Alizeh Merchant
Anant-Radhika Engagement: हम साथ साथ है! अंबानी कुटुंबियांच्या डान्सची देशभर चर्चा

अलिजेह लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचा पहिला सिनेमा 'बुधिया सिंग: बॉर्न टू रन' चे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते सोमेंद्र पाधी यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित होणार आहे. अलिझेहचा हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com