अमेरिकन जावयाच्या अंगावर सोलापुरी चादर...
अमेरिकन जावयाच्या अंगावर सोलापुरी चादर... विश्वभूषण लिमये

अमेरिकन जावयाच्या अंगावर सोलापुरी चादर...

पॉपस्टार निक जोनास झळकला सोलापुरी चादरीत..

सोलापूर : सोलापूरच्या पारंपरिक जेकार्ड चादरीची तसे पाहिल्यास जगभर ख्याती आहे. सोलापुरी चादरीची वैशिष्ट्ये ही की, आकर्षक डिझाईन, जाडसर, प्युअर कॉटन, ऊबदार, टिकाऊपणा असे आहे. परंतु, या चादरीचे इतर राज्यांतून डुप्लिकेशन सुरू होऊन, सोलापुरी चादरीला मोठा फटका बसला आहे. सोलापूरची चादर पांघरूण घेण्यासाठी उपयोगी आहे, असे म्हटले जाते.

हे देखील पहा-

मात्र, त्याचा आकर्षक फॅशनेबल शर्टही शिवून घेतला जाऊ शकतो. हे कोणाच्या मनात देखील आले नसेल. मात्र, चादरीपासून फॅशनेबल शर्ट शिवला जातो. तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो, हे सिद्ध केले आहे. अमेरिकन पॉपस्टार निक जोनास याने. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनासने सेंट लुईसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हा सोलापुरी जेकार्ड चादरीचा शर्ट घालून सहभागी झाला होता.

महाबळेश्‍वरमध्ये हिमकणांची पांढरीशुभ्र चादर

त्याने "या कपड्यांनी ऊब दिली' असे म्हणत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यामुळे सोलापुरी चादर पुन्हा एकदा जगात चर्चेचा विषय ठरला आहे. ही चादर सोलापुरातील चाटला टेक्‍स्टाईल इंडस्टीमध्ये तयार झाली असून, निकच्या या चादरीच्या शर्टाच्या बाहींवर "चाटला आर' हा ट्रेडमार्क लिहिलेला दिसून येतो.

विशेष म्हणजे, चाटला टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीजचे मालक गोवर्धन चाटला यांनाही त्यांच्या फॅक्‍टरीमधून तयार झालेल्या चादरपासून शर्ट तयार झाल्याचा आणि तोही अमेरिकन पॉप सिंगर निक जोनासने तो घातलेला पाहून आश्‍चर्य वाटले आहे. मात्र, यामुळे सोलापुरी चादरीची कीर्ती आता फॅशनेबल शर्टाच्या माध्यमातून सातासमुद्रापर्यंत पोहचली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com