
अभिनेता अमेय वाघ नेहमीच काहीतरी नवीन वेगळे करताना आपल्याला दिसतो. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या माध्यमातून अमेय वाघ घराघरात पोचलेला. अमेय नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करत असतो. अमेय तितक्याच विविधरंगी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमेय विकी कौशल आणि किशोरी शहाणेसोबत दिसत आहे.
अमेय वाघने मराठी चित्रपसृष्टीत पाय रोवल्यानंतर त्याच्या मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. अमेय 'गोविंद नाम मेरा' बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अमेय वाघ विकी कौशलच्या मित्राची भूमिका साकारणार आहे.
अमेय वाघने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर शेअर होते. तसेच त्याने शेअर केलेल्या या पोस्टरवर विकी कौशलने कमेंट देखील केली होती. अमेय नुकतेच दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमेयसह विकी कौशल, किशोरी शहाणे, विराज घेलानी दिसत आहेत. तसेच हे फोटो शेर करताना अमेयने, गो गो गो गोविंदा!!! गिविंदा नाम मेरा डिस्नी हॉटस्टारवर १६ डिसेंबरला ! असे कॅप्शन दिले आहे. अमेयने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक चाहते हार्ट शेअर करत आहेत. (Social Media)
यावरून हे लक्षात येते की, गोविंदा नाम मेरा हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. १६ डिसेंबर रोजी डिस्नी हॉटस्टारच्या प्रेक्षसकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरसह या चित्रपाचा टीझर आणि चित्रपटातील काही गाणी देखील प्रेक्षकांच्या समोर अली आहेत. प्रेक्षक आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती कारण जोहरने केली आहे. (OTT)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.