Sania Mirza- Shoaib Malik: सानिया-शोएबची जोडी एकत्र स्क्रिन शेअर करणार, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

गेल्या अनेक दिवसापासून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात बिनसल्याची चर्चा होती. १२ वर्ष सुखी संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोटही घेतला होता.
Sania Mirza Shoaib Malik
Sania Mirza Shoaib MalikSaam TV

Sania Mirza- Shoaib Malik New Announcement: गेल्या अनेक दिवसापासून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात काही तरी बिनसल्याचे वृत्त चर्चेत होते. १२ वर्ष सुखी संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोटही घेतला होता. अशातच या दोघांच्याही चाहत्यांसाठी एक गुड न्युज आहे. ते रिअल लाईफमधून जरी विभक्त झाले असले तरी ते टीव्ही स्क्रिनवर एकत्र झळकणार आहेत.

Sania Mirza Shoaib Malik
Kangana Ranaut: कंगना रणौतने इनस्टाग्रामबाबत केलं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, 'मुर्ख...'

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या आगामी कार्यक्रमाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शनिवारी रात्री, ओटीटी प्लॅटफॉर्म उर्दूफ्लिक्सने इंस्टाग्रामवर घोषणा केली की सानिया आणि शोएब मलिक द मिर्झा मलिक शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. त्या शोचे नाव 'द मिर्झा मलिक शो' असे आहे. स्टार कपल असलेल्या शोचे पोस्टर शेअर करताना, पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "मिर्झा मलिक शो लवकरच फक्त उर्दूफ्लिक्सवर."

Sania Mirza Shoaib Malik
RRR 2: आरआरआर सिनेमाच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार; दिग्दर्शकाने केली मोठी घोषणा

पोस्टरमध्ये सानिया शोएबच्या खांद्यावर हात ठेवून उभी असल्याचे दाखवले आहे.हे पोस्टर पाहून दोघांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकीकडे घटस्फोटोचे वृत्त येते तर एकीकडे दोघे एकत्र काम करत आहे. हे पाहिल्यावर चाहते खुश झाले आहेत. अनेक चाहत्यांना असे वाटले की या घोषणेने गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या अफवांचे खंडन करत आहेत का?

एका चाहत्याने लिहिले, "बहुत अच्छा लगा सुन कर. साथ रहो (हे पाहून खूप बरं वाटलं. एकत्र राहा)." दुसर्‍याने लिहिले, "एकमेकांना माफ करा एकमेकांसोबत रहा तुम्ही दोघे एकत्र छान दिसता. शोएबला दुसऱ्यासोबत पाहू शकत नाही. सानिया त्याच्यासाठी परफेक्ट आहे."

Sania Mirza Shoaib Malik
Rockey Aur Rani Ki Prem Kahani: करण ७ वर्षानंतर सिनेसृष्टीत करणार पदार्पण, आलियाला ही चित्रपटाची उत्सुकता

इतर, तथापि, सानिया किंवा शोएब दोघांनीही त्यांच्या हँडलवर पोस्ट शेअर केल्याने चाहते अधिकच गोंधळले. एकाने लिहिले की, "विभक्त होण्याच्या अफवा हा प्रचाराचा स्टंट होता का? सानियाला असं करायला आवडत नाही." सानिया आणि शोएब यांचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही १२ एप्रिल २०१० रोजी लग्नबंधनात अडकले होते.

त्या दोघांनी हैदराबादमध्ये लग्न केले होते. नंतर पाकिस्तानमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. सानिया मिर्झा हिने २०१८ मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव इझान असे आहे. सध्या सानिया ही ३५ वर्षांची असून शोएब मलिक हा ४० वर्षांचा आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com