Uunchai : अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्या मैत्रीचे खास क्षण, 'ऊंचाई'चे दुसरे पोस्टर रिलीज

नुकताच अमिताभ बच्चन यांनी एका नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSaam Tv

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)त्यांच्या दमदार अभिनयामुळे आणि चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर (Social Media)नेहमीच आपल्या नवीन प्रोजेक्टविषयीची माहिती देत चाहत्याची उत्सुकता वाढवतात. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातनंतर अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांनी एका नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. लवकरच अमिताभ 'उंचाई' या चित्रपटात दिसणार आहेत.

Amitabh Bachchan
OTT Entertainment: ओटीटीवर 'या' आठवड्यात मनोरंजनाचा अधिकमास

अमिताभ बच्चन आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन खास मित्र बोमन इराणी आणि अनुपम खेर यांच्यासोबत दिसत आहेत. अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करत त्यांनी, 'उचांई' चित्रपटाचे दुसरे पोस्टर शेअर करताना अभिमान वाटतो. लवकरच माझे मित्र अनुपम खेर आणि बोमन इराण यांच्यासोबत माझा हा चित्रपट पहा. धाडस आणि मैत्रीवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती सूरज बडजात्याने केली असून तारिख लक्षात ठेवा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात पाहायला विसरू नका' असा कॅप्शन दिला आहे.

राजश्री प्रॉडक्शनच्या या आगामी चित्रपटासाठी अमिताभ बच्चन खूप उत्सुक आहेत. अनेकदा ते चित्रपटाशी संबंधित पोस्ट शेअर करतात. आता देखील त्यांनी त्याच्या आगामी चित्रपटातील पोस्टर शेअर केला आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टरवर लाईक्स कमेंट्स केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर मुलगा अभिषेक बच्चने 'हार्ट ईमोजीसह वेलकम' अशी कमेंट केली आहे.

Amitabh Bachchan
परिणीती चोप्रा-आयुष्मान खुराना बॉक्स ऑफिसवर आमने-सामने, 'कोड नेम: तिरंगा' आणि 'डॉक्टर जी' होणार एकाच दिवशी रिलीज!

'उचांई'च्या यापोस्टरमध्ये ही त्रिमैत्री पर्वतरागांमध्ये बसलेली दिसत आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन मध्यभागी आहेत. तर त्याच्या एका बाजूला बोमन इराणी पाण्याची बाटली घेऊन बसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनुपम खेर जेवणाचा डबा घेऊन बसलेले दिसत आहेत. तिघेही हिवाळ्यातील पोशाखांमध्ये आहेत. अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात सारिका, नीना गुप्ता, परिणीती चोप्रा, नफीसा अली आणि डॅनी यांच्याही भूमिका आहेत.

अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्या 'गुडबाय' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. चित्रपटात साऊथची क्वीन रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करत आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com