
Amitabh Bachchan Health Update: बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच आपल्या कार्यामुळे सर्वत्र प्रचलित आहेत. काही दिवसांपुर्वीच अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये जखमी झाले होते. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवरुन चाहत्यांना याविषयी माहिती दिली होती. त्यावेळी सर्वच स्तरातून लवकरात लवकर बरे व्हा असं म्हणत शूभेच्छा दिल्या. नुकतेच बिग बींनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले.
आज सकाळी अर्थात सोमवारी सकाळी बिग बींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानत पोस्ट लिहिली आहे. अमिताभ यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “मला झालेल्या अपघाताविषयी ज्या ज्या लोकांनी चिंता व्यक्त केली, माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. ज्या पद्धतीनं तुम्ही सर्व माझ्यासाठी हळवे होता हे पाहून मी खरंच खूप भावूक झालो आहे. डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे, त्याचे मी खूप काटेकोरपणे पालन करत आहे.” असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.
पण आता बिग बींच्या चाहत्यांसाठी आंनदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकतंच सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत पुन्हा त्याच्या आरोग्याविषयी चाहत्यांना अपडेट दिली आहे. “अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत पोस्ट लिहिली की, माझ्या प्रकृतीसाठी सर्व प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. माझ्या तब्येतीत सुधारणा होतेय. लवकरच रॅम्पवर परत येईल अशी आशा आहे.” अशी पोस्ट शेअर करत त्यांनी लवकरच कामावर परतणार अशी आशा व्यक्त केली आहे.
या पोस्टवर कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देत अभिनेता राहुल देव म्हणतात, “म्हणून, ही बातमी ऐकून खूप आनंद झाला सर... नेहमीच तुमच्यावर प्रेम आहे.” तर एक चाहता कमेंट करत म्हणतो, “लवकर बरे व्हा!!! या वयातही तुमची सक्रिय जीवनशैली आमच्या पालकांसाठी आणि आजी-आजोबांसाठी प्रेरणादायी ठरते.” तर आणखी एक चाहता म्हणतो, “तुमच्या सोबत जगात कोणीही बरोबरी करु शकत नाही.”
नेहमीच बीग बी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतात. त्यांचे वय सध्या ८० असून ते आपल्या तब्येतीची काळजी घेत स्वत:ला कसं फिट ठेवण्यात येईल, हा विचार करतात. बिग बी गेल्या वर्षी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसले होते. त्यानंतर ते आता ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहेत. या आगामी चित्रपटात बीग बी ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.
सायन्स फिक्शन असणाऱ्या चित्रपटात बिग बींसोबत मुख्य चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना ॲक्शन सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचं बजेट ५०० कोटींच्या आसपास असल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकतंच चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.